Sharad Kelkar: केवळ अभिनेताच नव्हे तर, डबिंग क्षेत्रातही नाव गाजवणारा शरद केळकर (Sharad Kelkar) हा प्रेक्षकांचा लाडका अभिनेता बनला आहे. शरद केळकर हे एक असे नाव आहे ,जे टीव्हीपासून मोठ्या पडद्यावर सर्वत्र पाहायला मिळते. मॉडेलिंग असो, स्टेज शो असो, चित्रपट किंवा मालिकेत अभिनय असो किंवा व्हॉईस ओव्हर असो, प्रत्येक क्षेत्रात शरद केळकरचा मोठा दबदबा आहे. शरद केळकर यांनेच ‘बाहुबली’ला अर्थात प्रभासला आपला दमदार आवाज देऊन ही व्यक्तिरेखा आणखी उत्कृष्ट बनवली होती. असा हा बहुगुणी अभिनेता शरद केळकर आज (7 ऑक्टोबर) त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे.


अभिनेता शरद केळकर याचा जन्म मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील एका मराठी कुटुंबात झाला. लहान वयातच त्याचे पितृछत्र हरपले होते. याच कारणामुळे तो त्याच्या आई आणि बहिणीच्या खूप जवळ आहे. आई आणि बहिणीने शरदला नेहमी पुढे जाण्याची प्रेरणा दिली. शरदने प्रेस्टीज इन्स्टिट्यूट ऑफ मार्केटिंग अँड रिसर्च, ग्वाल्हेर येथून एमबीए शिक्षण पूर्ण केले आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात शरदने फिजिकल ट्रेनर म्हणूनही काम केले होते.


अशी झाली मनोरंजन विश्वात एन्ट्री...


शरद केळकर अभिनयाच्या दुनियेकडे वळण्याची कहाणीही खूप रंजक आहे. 2002 मध्ये तो एका मित्राला भेटण्यासाठी काही दिवसांसाठी मुंबईला आला होता. या दरम्यान त्याला ग्रासिम मिस्टर इंडिया इव्हेंटची माहिती मिळाली. शरदलाही याची उत्सुकता वाटली आणि तो या कार्यक्रमात सहभागी झाला. त्याचा हाच सहभाग त्याला मनोरंजन विश्वाची दारं खुली करून गेला. या स्पर्धेदरम्यान काही प्रायोजकांची नजर शरदवर पडली. यानंतर त्याला एका टीव्ही मालिकेसाठी विचारणा करण्यात आली.


मालिका विश्वातून अभिनयात पदार्पण


मालिकेची ऑफर स्वीकारत त्याने मनोरंजन विश्वात पाऊल टाकले. या अभिनेत्याने दूरदर्शनच्या 'आक्रोश' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर तो अनेक मालिकांमध्ये झळकला. ‘सीआयडी’, ‘उतरन’, ‘रात होने को है’ या त्याच्या काही प्रमुख गाजलेल्या मालिका आहेत. मालिकांव्यतिरिक्त, त्याने अनेक रिअॅलिटी शो देखील होस्ट केले आहेत. शरदने 'रॉक-अँड-रोल', 'सारेगामापा चॅलेंज', 'पती-पत्नी और वो’सारखे शो होस्ट केले होते. तर, ‘नच बलिए 2’मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता.


चित्रपटांसह डबिंग क्षेत्रातही सक्रिय


एकीकडे शरद छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालत होता, तर दुसरीकडे त्याला चित्रपटांमध्येही भरपूर काम मिळत होते. 2004मध्ये ‘हसल’मधून मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्यानंतर तो 'अ पेइंग घोस्ट', 'मोहेंजो दारो', 'रॉकी हँडसम', 'सरदार गब्बर सिंह', 'गेस्ट इन लंडन', 'राक्षस', 'भूमी', 'बादशाहो' आणि ‘तान्हाजी’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकला. अभिनयासोबतच त्याचा आवाजही दमदार आहे. ‘बाहुबली’ चित्रपटातील अमरेंद्र बाहुबली या व्यक्तिरेखेला त्याने आपला दमदार आवाज दिला आहे.


हेही वाचा :


Wah Re Shiva Song: ‘हर हर महादेव’ चित्रपटातील ‘वाह रे शिवा’ गाणं रिलीज; चित्रपट या दिवशी होणार प्रदर्शित


शरदला लाभली 'लक्ष्मी'...