Mithila Palkar : अभिनेत्री मिथिला पालकर (Mithila Palkar) अल्पावधीतच घराघरात पोहोचली आहे. कुरळ्या केसांच्या या गोड मुलीचा आज वाढदिवस आहे. मिथिलाला 'वेब सीरिजची क्वीन' म्हटले जाते. मिथिला नेहमीच प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता शोधण्याचा प्रयत्न करत असते. 


मिथिला पालकरचा जन्म 11 जानेवारी 1993 रोजी मुंबईत झाला. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मिथिलाचं बालपण दादरमध्ये गेलं. शाळेत असतानाच तिला अभिनयाची आणि नृत्याची गोडी निर्माण झाली. शाळेत असतानाच तिने अनेक नाटकात भाग घेतला. 


मिथिला अभिनेत्री असण्यासोबत गायिका, यूट्यूब स्टार आणि मॉडेलदेखील आहे. मिथिला पालकरने अभिनयक्षेत्रात करिअर करण्याचं ठरवल्यानंतर तिच्या निर्णयाला तिच्या कुटुंबियांनी विरोध केला होता. पण तिची आवड लक्षात घेत त्यांनी तिला अभिनय क्षेत्रात करिअर करायला सहमती दर्शवली. 


घराच्यांचा पाठिंबा मिळाल्यानंतर मिथिलाने वेगवेगळ्या वेबसीरिजच्या माध्यमातून आपल्या भूमिकांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. आज तिचे व्हिडीओ जगभरात लोकप्रिय आहेत. 'कन्फ्युजिंग थिंग्स अ गर्ल से' या युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून मिथिलाने तिच्या करिअरची सुरुवात केली. 






मिथिलाने अण्णा केंड्रिकच्या कप गाण्याच्या धर्तीवर 'ही चाल तुरुतुरु' हे क्लासिक मराठी गाणं गाऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या गाण्यामुळे मिथिला रातोरात स्टार झाली होती. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. 


मिथिलाने 2014 साली 'माझा हनीमून' या लघुपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर 2015 साली तिने 'कट्टी बट्टी' या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर अमेय वाघसोबतचा 'मुरांबा' या सिनेमात तिने काम केलं. तिचा हा सिनेमा प्रचंड गाजला. मिथिला आणि अमेय वाघची केमेस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली. 


मिथिलाच्या 'लिटील थिंग्स', 'ऑफिशिअल च्युकॅगिरी मिली','प्रेट्टी फिट' आणि 'गर्ल इन द सिटी' या वेबसीरिज चांगल्याच गाजल्या. तसेच कट्टी बट्टी, मुरांबा, कारवान आणि चॉपस्टिक्स या सिनेमात प्रेक्षकांना मिथिलाच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली आहे. 


संबंधित बातम्या


Mithila Palkar: मिथिला पालकरचा ग्लॅम अवतार; फोटो पाहताच चाहते घायाळ!