Manasi Naik : मराठी सिने-सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मानसीचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अखेर मानसीने अप्रत्यक्षरित्या या चर्चांवर मौन सोडलं आहे.
मानसीने एक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"आयुष्यात आपल्याला कायम साथ देणारे, आपल्यासोबत खंबीरपणे उभे राहणारे अनेक मित्र येतात. तुम्हाला आहे तसं ते स्वीकारतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल तुमच्या मनात आदर असतो. ते नेहमी तुम्हाला प्रोत्साहन देत असतात. जगात काहीही झालं तरी ते तुमच्यासोबत असतात".
मानसीने पुढे लिहिलं आहे,"पण माझ्या आयुष्यात काही माणसं आली तेव्हा मी डोळ्यासमोर काळी पट्टी बांधली होती. त्या माणसांनी वरीलपैकी एकही गोष्ट माझ्यासाठी केलेली नाही. वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा".
मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा अनेक दिवस एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर 19 जानेवारी 2021 रोजी मानसी आणि प्रदीप लग्नबंधनात अडकले. पण आता मानसी आणि प्रदीपमध्ये काहीतरी बिनसलं असल्याचं चित्र आहे. मानसीने प्रदीपसोबतचे फोटो डिलीट करण्यासोबत इन्स्टाग्राम अकाउंटवरील खरेरा आडनावही हटवलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून मानसी आणि प्रदीपने एकमेकांसाठी पोस्ट केलेली नाही. पण मानसी-प्रदीपने अद्याप या गोष्टीला दुजोरा दिलेला नाही. तसेच त्यांच्या नात्याविषयी अधिकृत भाष्य केलेले नाही. मानसीसा पती प्रदीप खरेरा हा एक बॉक्सर आणि मॉडेल आहे. तर 'बाई वाड्यावर या', 'वाट बघतोय रिक्षावाला' यांसारख्या गाण्यांमधून मानसीने चाहत्यांना वेड लावलं आहे.
संबंधित बातम्या