Lucky Ali Birthday : बॉलिवूड गायक, संगीतकार लकी अली (Lucky Ali) यांचा आज वाढदिवस आहे. लकी अली यंदा 65व्या वर्षात पदार्पण करत आहेत. वयाच्या या टप्प्यावरही त्यांनी आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. 19 सप्टेंबर 1958 रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. लकी अली यांचे संपूर्ण नाव मकसूद महमूद अली आहे. लकी अली यांनी गायलेली गाणी 90च्या दशकांत तुफान गाजली. केवळ तोच काळ नाही तर, आजही त्यांचा आवाज ऐकला की, जुन्या आठवणींमध्ये रमायला होतं. मध्यंतरीच्या काळात लकी अली हे नाव काहीसे पडद्यामागे गेले होते. मात्र, त्यांच्याच एका गाण्याने त्यांना पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात आणले आहे.


लकी अली (Lucky Ali) यांच्या संगीत कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1996 मध्ये केली होती. त्यांनी आपला ‘सुनो’ अल्बम लाँच केला होता. या अल्बममध्ये त्यांच्यासोबत मॉडेल अभिनेत्री मेघन जेन मॅकक्लेरी झळकली होती. लकी अली यांनी त्यांची कारकीर्द केवळ गाण्यापुरती मर्यादित ठेवली नाही. त्यांचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते मेहमूद यांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय विश्वात देखील पदार्पण केले होते. 1962मध्ये त्यांनी ‘छोटे नवाब’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. यानंतर त्यांनी 1970 आणि 1980च्या दशकात ‘ये है जिंदगी’, ‘हमारे तुम्हारे’, ‘त्रिकाल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी संजय गुप्ता यांच्या ‘कांटे’ आणि ‘सूर’ या चित्रपटातही काम केले होते. या दोन्ही चित्रपटातील भूमिकांमधून त्यांना खूप वाहवा मिळाली. परंतु, लकी अली नेहमी लक्षात राहिले ते त्यांच्या गाण्यामुळे....


ओ सनम


लकी अली यांचे ‘ओ सनम’ हे गाणे आजही काहींच्या प्लेलिस्टवर अग्रक्रमी आहे. या गाण्याने श्रोत्यांना अक्षरशः वेड लावले होते. त्यांच्या या गाण्याची जादू आजही तरुणाईवर दिसून येते.



सफरनामा


रणबीर कपूर, दीपिका पदुकोण अभिनित ‘तमाशा’ या चित्रपटातील ‘सफरनामा’ हे गाणे लकी आली यांनी गायले आहे. आपल्या रोड ट्रीपमध्ये किंवा प्रवासात प्रत्येकाने एकदा तरी हे गाणे नक्कीच ऐकले असेल.



आ भी जा...


‘आ भी जा...’ या गाण्यात लकी अली यांचा आवाज आणि त्यांचे व्हॉयलिन वादन यांचा अनोखा मिलाफ पाहायला मिळाला. 2002मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सूर’ या चित्रपटासाठी हे गाणे तयार करण्यात आले होते.



कितनी हसीन जिंदगी


लकी अली यांचे ‘कितनी हसीन जिंदगी’ हे गाणे 1998मध्ये रिलीज झाले होते. या गाण्याने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते.



ना तुम जानो ना हम


अभिनेता हृतिक रोशन अभिनित ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातील ‘ना तुम जानो ना हम’ हे गाणे तुफान गाजले होते.



वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :