Happy Birthday Kulbhushan Kharbanda : कुलभूषण खरबंदा (Kulbhushan Kharbanda) हे नाव तसं बॉलिवूडसाठी नवं नाही. आज ज्येष्ठ अभिनेते कुलभूषण खरबंदा हे त्यांचा 78 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी अधिक सहाय्यक भूमिका केल्या असल्या, तरी आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रत्येक पात्रात जीव ओतला आहे. कुलभूषण खरबंदा यांनी बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध व्यक्तींसोबत काम केले आहे. याशिवाय तो पंजाबी चित्रपट सृष्टीतही सक्रिय होते. या चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी वेब सीरिजमध्येही आपली जादू चालवली आहे. 'मिर्झापूर' या वेब सीरिजमध्ये त्यांनी सत्यानंद त्रिपाठी यांची भूमिका साकारली होती.
कुलभूषण खरबंदा यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1944 रोजी आता पाकिस्तानात असलेल्या हसन अब्दाल अर्थात पाकव्याप्त पंजाब येथे झाला. भारत पाकिस्तानच्या फाळणीनंतर हे ठिकाण पाकिस्तानात गेले. मात्र, कुलभूषण खरबंदा यांच्या कुटुंबाने भारताला आपला देश मानले आणि ते भारतात स्थायिक झाले.
बालपणापासूनच अभिनयाची आवड
कुलभूषण यांनी सुरुवातीचे शिक्षण पंजाबमधून, नंतर दिल्ली विद्यापीठाच्या किरोरीमल महाविद्यालयातून पूर्ण केले. कॉलेजच्या काळापासूनच कुलभूषण खरबंदा यांना अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना त्यांनी अनेक नाटकांमध्ये भाग केला होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर कुलभूषण खरबंदा यांनी मित्रांसोबत 'अभियान' नावाचा नाटकं ग्रुप सुरू केला. यानंतर कुलभूषण खरबंदा यांनी अनेक नाट्यसमूहांना जोडले. चित्रपटांकडे वळण्यापूर्वी त्यांनी बराच काळ रंगभूमीवर काम केले. यानंतर कुलभूषण खरबंदा यांनी चित्रपटांकडे वळण्याचा निर्णय घेतला होता.
बॉलिवूड कारकीर्द
कुलभूषण खरबंदा यांनी 'जादू का शंख' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘जादू का शंख’ हा चित्रपट 1974 साली आला होता. त्याच वर्षी तो श्याम बेनेगल यांच्या 'निशांत' चित्रपटातही ते झळकले. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. यानंतर कुलभूषण खरबंदा यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्याने 'भूमिका', 'अर्थ', 'कलयुग', 'मैं जिंदा हूं' आणि 'नसीब'सह एकापेक्षा एक हिटबॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी जवळपास सर्वच चित्रपटांमध्ये सहकलाकाराची भूमिका साकारली. परंतु, त्यांनी आपल्या अभिनयाने चित्रपटाच्या पडद्यावर अमिट छाप सोडली.
‘शाकाल’ने गाजवले मनोरंजन विश्व
कुलभूषण खरबंदा यांनी 'शान' या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारून बरीच चर्चा निर्माण केली होती. 'शान' हा चित्रपट 1980मध्ये आला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, शशी कपूर आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटात कुलभूषण खरबंदा यांच्या ‘शाकाल’ या व्यक्तिरेखेने बरीच लोकप्रियता मिळवली. ‘मिर्झापूर’ या लोकप्रिय आणि हिट वेब सीरिजमधील त्यांच्या भूमिकेमुळेही कुलभूषण खरबंदा खूप चर्चेत आले होते.
हेही वाचा :