Rapper Badshah Birthday: प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाह (Badshah) हा त्याच्या गाण्यांनी नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. आज (19 नोव्हेंबर) त्याचा वाढदिवस आहे. बादशाहचं खरं नाव आदित्य प्रतीक सिंह सिसोदिया असं आहे. त्याचा जन्म 19 नोव्हेंबर 1985 रोजी दिल्लीमध्ये (Delhi) झाला. बादशाह हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. जाणून घेऊयात बादशाहच्या संपत्तीबाबत तसेच करिअरबाबत...


बादशाहच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती


बादशाहने 2006 मध्ये प्रसिद्ध गायक आणि रॅपर असणाऱ्या हनी सिंहसोबत आपल्या करिअरची सुरुवात केली.  बादशाह हा  हनी सिंहच्या हिप हॉप ग्रुपमध्ये सामील झाला. त्यानंतर 2012 मध्ये दोघे वेगळे झाले. नंतर बादशाहने 'कर गई चुल' हे गाणे रिलीज केले. हे गाणे 'कपूर अँड सन्स' चित्रपटात बादशाहनं वापरले गेले. 2015 मध्ये बादशादचं 'डीजे वाले बाबू' हे गाणं रिलीज झालं. हे गाणे प्रचंड गाजले. 2018 मध्ये, बादशाहने त्याचा पहिला अल्बम 'ओरिजिनल नेव्हर एंड्स' (O.N.E.) रिलीज केला. बादशाहच्या पार्टी साँग्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. लाल गेंदा फूल, पानी पानी जुगनु, हाय गरमी, लेट्स नाचो या बादशाहच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. 


बादशाह आहे कोट्यवधींचा मालक


बादशाहचे दिल्लीत स्वतःचे घर आहे, ज्याची किंमत 12 कोटी रुपये आहे. बादशाहकडे अनेक लग्झरी गाड्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, बादशाहची एकूण संपत्ती 37 कोटी रुपये आहे.


बादशाह हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. 2012 मध्ये बादशाहनं जॅस्मिनसोबत लग्नगाठ बांधली. 2017 मध्ये जॅस्मिन आई-वडील झाले. त्यांना एक मुलगी झाली. मुलीचं नाव त्यांनी जेसी ग्रेस असं ठेवलं. रिपोर्टनुसार, लॉकडाऊन दरम्यान जॅस्मिन आणि बादशाह यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्यानं  लॉकडाऊन संपल्यानंतर जॅस्मिन तिच्या मुलीला घेऊन लंडनला गेली. बादशाह आणि जॅस्मिन दोघे विभक्त झाले, असं म्हटलं जातं. सध्या बादशाहचं नाव  अभिनेत्री ईशा रिखीसोबत जोडलं जात आहे. दोघे एकमेकांना डेट करत आहेत, असं म्हटलं जात आहे.दोघांची ओळख एका कॉमन फ्रेंडद्वारे झाली.  त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली, अशी चर्चा सध्या सुरु आहे. पण बादशाहनं  ईशा रिखीसोबतच्या नात्याबाबात अजून कोणतीही माहिती दिली नाही. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Badshah:  बादशाह पुन्हा पडलाय प्रेमात? पंजाबी अभिनेत्रीसोबत डेटिंगच्या चर्चा