Arijit Singh : बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अरिजित सिंहचा (Arijit Singh) आज वाढदिवस आहे. अरिजितची गणना बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट गायकांच्या यादीत होत असते. अरिजित आज आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘मर्डर 2’च्या ‘फिर मोहब्बत’ या गाण्याच्या माध्यमातून अरिजितने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. पण 'आशिकी 2' या सिनेमाच्या माध्यमातून तो रातोरात स्टार झाला. अरिजितच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्याच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांबद्दल...


अरिजित सिंहच्या 'टॉप 10' गाण्यांबद्दल जाणून घ्या.. (Arijit Singh Top 10 Songs)


1. फिर ले आया दिल 


अनुराग कश्यपच्या 'बर्फी' या सिनेमातील 'फिर ले आया दिल' हे गाणं अरिजित सिंहने गायलं आहे. अरिजितच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांच्या यादीत या गाण्याचा समावेश होतो. या गाण्याचे बोल संगीत प्रीतमने लिहिले आहेत. 


2. कबीरा (ये जवानी है दीवानी)


रेखा भारद्वाज आणि अरिजित सिंह यांचं 'ये जवानी है दीवानी' या सिनेमातील 'कबीरा' हे गाणं चांगलचं लोकप्रिय आहे. या गाण्यात रणबीर आणि दीपिकाचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळाला होता. 



3. मस्त मगन (2 स्टेट्स)


'2 स्टेट्स' या सिनेमातील 'मस्त मगन' हे गाणं चिनमय आणि अरिजित सिंहने गायलं आहे. 


4. जुदाई (बदलापुर)


जुदाई हे गाणं डोळ्यात पाणी आणणारं आहे. अरिजित सिंह आणि रेखा भारद्वाजचा आवाज या गाण्याला लाभला आहे. 


5. चन्ना मेरेया (ए दिल है मुश्किल)


अरिजित सिंहचं 'चन्ना मेरेया' हे गाणं खूपच लोकप्रिय आहे. 


6. तुम ही हो (आशिकी 2)


अरिजित सिंहच्या सुपरहिट गाण्यांमध्ये 'आशिकी 2' या गाण्याचा समावेश होतो. या गाण्याचे अनेक वर्जन आले असून हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. 



7. दुआ (संघाई)


दुआ हे गाणंदेखील अरिजितच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. 


8. गेरूआ


अरिजित सिंहचं 'गेरूआ' हे गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. 


9. इलाही (ये जवानी है दीवानी)


अरिजीत सिंहने आपल्या खास अंदाजात 'ये जवानी है दीवानी' या सिनेमातील इलाही हे गाणं गायलं आहे. 


10. नशे-सी-चढ गई (बेफिक्रे)


अरिजितच्या 'नशे-सी-चढ गई' या गाण्याचा समावेश त्याच्या सुपरहिट गाण्यांमध्ये केला जातो. 


अरिजित सिंहच्या 'फिर भी तुमको चाहूंगा', 'पछताओगे', 'पल', 'खैरियत', 'सोच ना सके', 'इलाही', 'हमारी अधुरी कहानी' या  गाण्यांनी चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं आहे. 


संबंधित बातम्या


Happy Birthday Arijit Singh: घरातूनच मिळाला संगीताचा वारसा, अनेकदा नकार पचवूनही अरिजितने गाजवलं संगीत विश्व!