Happy Birthday Anu Malik: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अनु मलिक (Anu Malik) यांचा आज 62 वा वाढदिवस. 02 नोव्हेंबर 1960 रोजी अनु मलिक यांचा मुंबईमध्ये (Mumbai) जन्म झाला. अनु मलिक यांच्या बाजीगर (Baazigar), फिजा (Refugee) आणि 'मैं हूं ना (Main Hoon Na) या चित्रपटातील (Movie) गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. अनु मलिक यांनी संगीत क्षेत्रात प्रचंड यश मिळले. आज अनु मलिक यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्याबाबत काही खास गोष्टी....
संगीत क्षेत्रात नाही तर या क्षेत्रात करायचे होते करिअर-
अनु मलिक हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. पण त्यांना संगीत क्षेत्रात नाही तर पोलीस अधिकारी व्हायचे होते. अनु मलिक स्वत: एका मुलाखतीत याबाबत माहिती दिली होती. त्यांनी पोलीस अधिकारी होण्यासाठी परीक्षेची तयारीही केली होती. पण, नंतर त्यांना संगीत क्षेत्रात आवड निर्माण झाली.
अनु मलिक यांनी 1977 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हंटरवाली77' या चित्रपटातून संगीत क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर अनेक हिट चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले. अनु मलिक यांना दोनदा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कारही मिळाला आहे. यासोबतच 2001 साली रिलीज झालेल्या ‘रिफ्युजी’ चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट संगीतासाठी राष्ट्रीय पुरस्कारही अनु मलिक यांना मिळाला. सध्या अनु मलिक हे वेगवेगळ्या रिअॅलिटी शोचे परिक्षण करत आहेत.
नेहा कक्कडचं गाणं ऐकून दिली होती प्रतिक्रिया
काही दिवसांपूर्वी अनु मलिक यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एका कार्यक्रमात नेहा कक्कड आणि एक स्पर्धक गाणं गाऊन दाखवताना दिसत आहेत. नेहाचं गाणं ऐकून अनु मलिक हे प्रतिक्रिया देतात. ते म्हणतात, 'नेहा कक्कड...तेरी आवाज सुनकर लगता है अपने मुंह पर मारूं थप्पड' या व्हिडीओला अनेकांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: