Alok Nath Birthday : बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये संस्कारी बाबूजींची भुमिका साकारणारे अभिनेते आलोक नाथ (Alok Nath) यांचा आज (10 जुलै) वाढदिवस आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. आपल्या अभिनयाने त्यांनी अनेक पात्रांना पडद्यावर अक्षरशः जिवंत केले. आलोक नाथ यांचा जन्म बिहारच्या खगाडीया जिल्ह्यात झाला होता. बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली.
आलोक नाथ यांचा जन्म एका अशा कुटुंबात झाला होता, ज्यांना मनोरंजन विश्वाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. कॉलेजमध्ये असताना त्यांना अभिनयाची गोडी लागली. यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. इथे त्यांनी 3 वर्ष अभिनयाचे शिक्षण घेतले. दूरदर्शनच्या ‘रिश्ते नाते’ या मालिकेमधून त्यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती.
‘या’ चित्रपटामुळे मिळाला ‘संस्कारी बाबूजी’ टॅग!
1982 मध्ये त्यांनी 'गांधी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. या चित्रपटात आलोक नाथ यांची भूमिका छोटी होती, पण त्यामुळे त्यांच्यासाठी बॉलिवूडचे दार खुले झाले. वयाच्या 32व्या वर्षी त्यांनी ‘कयामत से कयामत’ या चित्रपटात वडिलांची भूमिका साकारली होती. यात चित्रपटात त्यांनी सिंगल फादरची भूमिका केली होते. ही भूमिका अनेकांच्या हृदयाला स्पर्श करून गेली. या चित्रपटापासून त्यांना अशाच प्रकारच्या भूमिका अधिक ऑफर होऊ लागल्या आणि बॉलिवूडमध्ये त्यांची इमेज ‘संस्कारी बाबूजी’ अशी झाली.
रोमँटिक चित्रपटातही केलेय काम
आता अवघं बॉलिवूड आलोक नाथ यांना केवळ ‘संस्कारी बाबूजी’ म्हणून ओळखत असलं तरी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत रोमँटिक हिरो म्हणूनही काम केले आहे. आलोक नाथ यांनी 1987मध्ये आलेल्या 'कामाग्नी' चित्रपटात खूप बोल्ड सीन्स दिले होते. याशिवाय त्यांनी काही चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिकाही साकारल्या आहेत.
'हम साथ-साथ हैं', 'हम आपके है कौन', 'परदेस', 'मैने प्यार किया', 'विवाह' यांसारखे चित्रपट, तर 'सपना बाबुल का बिदाई','मैं रहने वाली महलों की','यहां मैं घर-घर खेली','बुनियाद' यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी वडिलांच्या भूमिका साकारल्या आहेत.
हेही वाचा :
Kubbra Sait : 'बॉलिवूडमध्ये अनेक राक्षस'; कुब्रा सैतला लोकांनी दिला होता सल्ला