Hanuman OTT Release : दाक्षिणात्य सुपरस्टर तेजा सज्जाचा (Teja Sajja) 'हनुमान' (Hanuman) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. ओटीटी विश्वातही हा सिनेमा चांगलाच धमाका करणार असल्याचं म्हटलं जात आहे.


प्रशांत वर्मा (Prashant Varma) दिग्दर्शित दिग्दर्शित 'हनुमान' या सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर दिवसेंदिवस हा सिनेमा चांगलाच गल्ला जमवत आहे. तेजा सज्जाच्या चाहत्यांना हा सिनेमा आवडला आहे. अभिनेत्याच्या अॅक्शन मोडचं सर्वत्र कौतुक होत आहे.


'हनुमान' ओटीटीवर होणार रिलीज! (Hanuman OTT Release)


'हनुमान' (Hanuman OTT Release) हा सिनेमा 12 जानेवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमागृहात धमाका केलेला हा सिनेमा ओटीटीवर कधी रिलीज होणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. हनुमान हा सिनेमा 2 मार्च 2024 रोजी झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊ शकतो. 






'हनुमान' या सिनेमात तेजा सज्जा मुख्य भूमिकेत आहे. तेजा सज्जासह अमृता अय्यर, विनय राय आणि वरलक्ष्मी सरथकुमार हे कलाकारही या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. प्रशांत वर्मा (Prashant Varma) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.


'हनुमान'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Hanuman Box Office Collection)


'हनुमान' हा सिनेमा 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. रिलीजच्या पहिल्या दिवशी अर्थात ओपनिंग डेला या सिनेमाने 8.5 कोटींची कमाई केली. तर एका आठवड्यात या सिनेमाने 99.85 कोटींचा गल्ला जमवला. दुसऱ्या आठवड्यात या सिनेमाने 58.65 कोटींची कमाई केली. आतापर्यंत रिलीजच्या 19 दिवसांत या सिनेमाने 174.85 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 256.3 कोटींचा गल्ला जमवला आहे.


'हनुमान' या सिनेमात एका तरुण मुलाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. या तरुणाला हनुमानाप्रमाणे सुपरपावर मिळते. सुपरपावर मिळाल्यानंतर हा तरुण आपल्या लोकांसाठी लढतो. तेजा सज्जाने या सिनेमात तरुण मुलाचं पात्र साकारलं आहे. सुपरहिरोच्या रुपातला तेजा सज्जा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.


संबंधित बातम्या


Hanuman : राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा तेजा सज्जाच्या 'हनुमान'ला फायदा; सिनेमाने कमावला कोट्यवधींचा गल्ला