मुंबई : कोई मिल गया, जागो सारखे चित्रपट, शाकालाका बुम बुम, देस मे निकला होगा चांद, क्योंकि सास भी.. यासारख्या मालिकांतून बालकलाकार म्हणून घराघरात पोहचलेली अभिनेत्री हंसिका मोटवानी दाक्षिणात्य चित्रपटातून नाव कमवत आहे. हंसिका आता अभिनेता गोपीचंदसोबत सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
टॉलिवूडचे दिग्दर्शक संपत नंदी अभिनेता गोपीचंदसोबत नव्या चित्रपटाची तयारी करत आहेत. अभिनेत्री हंसिकाची आता अभिनेत्री म्हणून निवड झाल्याची माहिती आहे. चित्रपटाचं नाव अद्याप ठरलेलं नाही. मात्र हा चित्रपट मनोरंजनाने पुरेपूर भरलेला असेल अशी अटकळ बांधली जात आहे.
हंसिकाने हिंदी मालिका-चित्रपटांपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अधिक भूमिका केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृतीसाठी 'चेन्नई टर्न्स पिंक' या उपक्रमाची ती ब्रँड अॅम्बेसेडर होती. 2014 मध्ये फोर्ब्सच्या शंभर प्रभावशाली व्यक्तींच्या यादीसाठी तिचं 250 जणांमध्ये नामांकन झालं, मात्र तिची निवड होऊ शकली नव्हती.