Scoop:  गेल्या काही दिवसांपासून स्कूप (Scoop) या नेटफ्लिक्सवरील (Netflix) सीरिजची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्री करिश्मा तन्नानं (Karishma Tanna) जागृती पाठक नावाच्या जर्नलिस्टची भूमिका साकारली आहे. या सीरिजमधील करिश्माच्या अभिनयाचं अनेकजण कौतुक करत आहेत. या सीरिजचं दिग्दर्शन हंसल मेहता (Hansal Mehta) यांनी केलं आहे. एका मुलाखतीमध्ये हंसल मेहता यांनी  जागृती पाठक या भूमिकेसाठी करिश्मा तन्नाची निवड का केली?  या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. 


हंसल मेहता यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं,  "बर्‍याच मुलींप्रमाणेच करिश्माने देखील ऑडिशन दिले.  मला वाटते की, 100 पेक्षा जास्त मुलींंनी ऑडिशन दिले होते आणि त्यामधील 20 मुलींची यादी मला मुकेशकडून मिळाली होती. ती यादी मी बघत होतो. त्यामधील करिश्माचे ऑडिशन मी पाहिले. नंतर मी मुकेशसोबत बोललो. तो मला म्हणाला, 'करिश्मा तन्नाला निवडलंस ना?'आणि मी म्हणालो, 'हो, तुला कसं माहीत?'. तो म्हणाला, 'मला वाटलंच होतं'.


पुढे हंसल मेहता यांनी सांगितलं, "करिश्मानं ऑडिशन दिले आणि तिने ऑडिशननंतर मला मेसेजही केला होता. त्या मेसेजमध्ये तिनं लिहिलं, 'सर, मी तुमच्या शोसाठी ऑडिशन दिले आहे आणि मला खूप मजा आली.' मी तिच्या मेसेजला रिप्लाय दिला नाही. त्यानंतर मी विचार केला की, तिला स्वतःला सिद्ध करायचे आहे. मी एक उत्तम अभिनेत्री आहे, असं ती समोरच्याला भासवत नाही. स्वत:ला सिद्ध करण्याची तिची धडपड मला जागृती या भूमिकेशी ओव्हरलॅप होत असल्याचं जाणवलं. त्यामुळे आम्ही करिश्माला निवडलं.'






'स्कूप' ची स्टार कास्ट


स्कूप या वेब सीरिजमध्ये करिश्मासोबतच हरमन बावेजा, मोहम्मद झीशान अय्युब, प्रोसेनजीत चॅटर्जी या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकरली आहे. ही वेब सीरिज 2 जून रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. या सीरिजचे एकूण सहा एपिसोड आहेत. . 'स्कूप' ही वेब सीरिज अशा एका पत्रकारावर आधारित आहे, जी स्वत: ची बाजू मांडण्यासाठी लढत असते.


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Scoop review: एका महिला पत्रकाराची गोष्ट; हंसल मेहता यांची 'स्कूप' वेब सीरिज कशी आहे? जाणून घ्या