मुंबई : कुख्यात तस्कर हाजी मस्तानचा मानसपुत्र सुंदर शेखरने सुपरस्टार रजनीकांतला धमकी दिली आहे. हाजी मस्तान यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवा, पण यात त्यांच्या प्रतिमेला धक्का लागला तर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा सुंदरने दिला आहे.
आपण हाजी मस्तानच्या आयुष्यावर फिचर फिल्म बनवताय, ही चांगली गोष्ट आहे पण, त्यांच्या प्रतिमेला धक्का लागणार नाही याची विशेष खबरदारी घ्या. जर हाजी मस्तानला अंडरवर्ल्ड डॉन किंवा स्मगलर दाखवलं तर त्याचे वाईट परिणाम भोगण्यासही तयार राहा, असं सुंदरने धमकीच्या व्हिडिओत म्हटलं आहे.
कुठल्याही न्यायालयात हाजी मस्तानवर लागणारे स्मगलिंग किंवा अंडरवर्ल्डचे आरोप सिद्ध झालेले नसल्याचं सुंदर शेखरचं म्हणणं आहे. अभिनेता रजनीकांत हाजी मस्तानच्या आयुष्यावर गॉडफादर नावाचा सिनेमा करत आहे.