मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने ट्विटरवर चाहत्यांकडून मदत मागितली आहे. शाहिदला आपल्या परिचीत आणि वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ मि. लिंकन कोएल्हो यांना शोधण्यासाठी सोशल मीडियावर चाहत्यांकडून मदत हवी आहे.
वृत्तानुसार, डॉ. कोएल्हो 21 मे रोजी सकाळी 9.50 वाजता वांद्र्यातील सेंट पीटर चर्चला जाण्यासाठी घराबाहेर पडले होते. पण त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत.
शाहिद कपूरची पत्नी मीराची प्रसुती याच डॉक्टरांनी केली होती. शिवाय शाहिद-मीरा या जोडप्याचे ते निकटवर्तीय आहेत.
शाहिदने डॉक्टरांचा फोटो पोस्ट करुन ट्विटरवर लिहिलं आहे की, " मि. लिंकन कोएल्हो आज (21 मे) सकाळपासून बेपत्ता आहेत. त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास +91 9821094395 या क्रमांकावर कळवा."
https://twitter.com/shahidkapoor/status/866343997811421184
https://twitter.com/shahidkapoor/status/866344773820588033
दरम्यान, डॉक्टर कोएल्हो यांची पत्नी किरण कोएल्होही स्त्रीरोगतज्ज्ञ असून त्या मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये काम करतात.