मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट यांचा आगामी सिनेमा 'गली बॉय'चं आणखी एक गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. हे गाणंसुद्धा रॅप स्वरुपाचं असून रणवीरनेच गायलं आहे. यापूर्वी या सिनेमातील दोन गाणीआणि ट्रेलर प्रदर्शित झाले होते.
मुंबईमधील धारावीतील रॅप गायकाच्या जीवनावर आधारित 'गली बॉय' हा सिनेमा बनवण्यात आला आहे. ज्याचं 2.31 सेकंदाचं तिसरं गाणंही प्रदर्शित झालं आहे. 'दूरी' असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरत आहे.
या गाण्याला रिषी रिच यांनी संगीत दिलं असून याचे बोल जावेद अख्तर आणि डिवाइन यांनी लिहिले आहेत. या गाण्यात झोपडपट्टीतील लोकांचं आयूष्य दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलं आहे. यू-ट्यूबवर दुरी या गाण्याला आतापर्यंत 8 लाखांच्या आसपास लोकांनी पाहिलं आहे.
'गली बॉय' हा सिनेमा रॅपर फर्नांडिज आणि नावेद शेख यांच्या जीवनावर चित्रीत करण्यात आला आहे. ज्याचं दिग्दर्शन जोया अख्तर यांनी केलं आहे. या सिनेमात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
अभिनेता रणवीर सिंहने या सिनेमासाठी खास मेहनत घेतली आहे. त्याने रॅपरकडून रॅप गायनाची ट्रेनिंगही घेतली असल्याचं कळतय. 14 फेब्रवारी रोजी हा सिनेमा देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी या सिनेमातील गाण्यांना चांगलीच पसंती मिळत आहे.
'गली बॉय'चं आणखी एक गाणं प्रदर्शित
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Jan 2019 08:47 PM (IST)
मुंबईमधील धारावीतील रॅप गायकाच्या जीवनावर आधारित 'गली बॉय' हा सिनेमा बनवण्यात आला आहे. ज्याचं 2.31 सेकंदाचं तिसरं गाणंही प्रदर्शित झालं आहे. 'दूरी' असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -