मुंबई : पहिले भारतीय अंतराळवीर अशी ख्याती असलेल्या राकेश शर्मा यांचा बायोपिक पुन्हा एकदा रखडणार असे दिसत आहे. राकेश शर्मांच्या बायोपिकला आमिर खानने नकार दिल्यानंतर त्याच्या जागी शाहरुख खानची वर्णी लागली होती. परंतु आता शाहरुखनेही या चित्रपटाला नकार दिल्यामुळे या चित्रपटासाठी पुन्हा एकदा नव्या अभिनेत्याचा शोध सुरु झाला आहे.
राकेश शर्मांच्या बायोपिकमध्ये सुरुवातीला निर्मात्यांनी मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला घेतले होते. परंतु काही दिवसांनी आमिरने त्यास नकार दिला. या चित्रपटात शाहरुख खानला घ्यावे, अशी आमिरने निर्मात्यांना गळ घातली. त्यानंतर निर्माता दिग्दर्शकांनी या चित्रपटासाठीच्या इतर कामांना सुरुवात केली. परंतु 'झिरो' चित्रपट फ्लॉप गेल्यामुळे सध्या चिंतेत असलेल्या शाहरुखनेही या चित्रपटाला नकार दिला आहे.
आमिर आणि शाहरुखने या चित्रपटाला नकार दिल्यानंतर राकेश शर्मांच्या भूमिकेसाठी सध्या विकी कौशलच्या नावाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. 'सारे जहाँसे अच्छा', असे या बायोपिकचे नाव असणार आहे.
दिग्दर्शक महेश मथाई या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून रॉनी स्क्रूवाला हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. रॉनी स्क्रूवाला यांची निर्मिती असलेल्या 'उरी : दी सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटात विकी कौशल प्रमुख भूमिकेत होता. काल विकी कौशल हा स्क्रूवाला यांच्या कार्यालयात गेला होता. त्यावेळी स्क्रूवाला आणि विकीमध्ये राकेश शर्मा यांच्या बायोपिकमधील भूमिकेविषयी चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
राकेश शर्मांच्या बायोपिकला आमिरनंतर शाहरुखचाही नकार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Jan 2019 11:13 AM (IST)
पहिले भारतीय अंतराळवीर अशी ख्याती असलेल्या राकेश शर्मा यांचा बायोपिक पुन्हा एकदा रखडणार असे दिसत आहे. राकेश शर्मांच्या बायोपिकला आमिर खानने नकार दिल्यानंतर आता शाहरुखनेही नकार दिला असल्याचे बोलले जात आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -