Gudi Padwa 2023 : महाराष्ट्राच्या घराघरांत आज गुढी उभारुन नववर्षाचं स्वागत करण्यात येत आहे. आज अनेक सेलिब्रिटी शोभायात्रेत सहभागी झाले आहेत. तर काहींनी कुटुंबियांसोबत गुढीपाडवा साजरा केला आहे. रवी जाधवपासून (Ravi Jadhav) रेणुका शहाणेपर्यंत (Renuka Shahane) अनेक मराठमोळ्या कलाकारांनी गुढीसोबतचा फोटो पोस्ट करत चाहत्यांना गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हेमांगी कवीचा मराठमोळा लुक
हेमांगी कवीने मराठमोळ्या लुकमधील गुढीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने लिहिलं आहे,"गुढी पाडवा आणि नूतन वर्षाच्या तुम्हा सर्वांना मन:पुर्वक शुभेच्छा".
स्वानंदी टिकेकरने दिल्या शुभेच्छा
स्वानंदी टिकेकरने गुढीसोबतचा फोटो पोस्ट करत लिहिलं आहे,"गुढी पाडव्याच्या खूप शुभेच्छा".
साक्षी गांधीचं गुढीपाडव्या निमित्त खास फोटोशूट
'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेतील अभिनेत्री साक्षी गांधीने गुढीपाडव्यानिमित्त खास फोटोशूट केलं आहे. फोटो शेअर करत तिने खास कॅप्शनदेखील लिहिलं आहे. तिने लिहिलं आहे,"चंदनाच्या काठीवर, शोभे सोन्याचा करा... साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा...मंगलमय गुढी, त्याला भरजरी खण, स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण... गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा".
मधुराणीने चाहत्यांना दिल्या शुभेच्छा
'आई कुठे काय करते' या मालिकेत मुख्य भूमिकेत असणाऱ्या मधुराणीने गुढीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत तिने लिहिलं आहे,"चैत्र गुढीपाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!!!".
संकर्षण कऱ्हाडेच्या फोटोने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने दोन्ही मुलं आणि गुढीसोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रवी जाधनने पत्नीसोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना दिल्या शुभेच्छा
रवी जाधनने पत्नीसोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"गुढी उभारू आनंदाची, समृद्धीची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची, नववर्षाच्या शुभेच्छा..शुभ गुढीपाडवा".
गौतमी देशपांडेने दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
गौतमी देशपांडेने गुढी पाडवा आणि नवं वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, असं म्हणत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सिद्धार्थ खिरीडने चाहत्यांना दिल्या शुभेच्छा
'हृदयी प्रीत जागते' या मालिकेत मुख्य भूमिकेत असणाऱ्या सिद्धार्थने चाहत्यांना गुढी पाडव्याच्या आणि मराठी नवं वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राहुल देशपांडेंनी कुटुंबियांसोबत साजरा केला गुढीपाडवा
राहुल देशपांडे यांनी कुटुंबियांसोबत गुढीपाडवा साजरा केला आहे. गुढीसोबतचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"सर्वांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा".
रेणुका शहाणेने दिल्या गुढीपाडव्या शुभेच्छा
रेणुका शहाणेने गुढीसोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
संबंधित बातम्या