मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका सिंह सध्या कुठल्या मालिकेत दिसत नसली, तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र ती आपल्या चाहत्यांच्या भेटीला येत असते. आता दीपिकाने इन्स्टाग्रामवर दोन-तीन व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओत ती बीचवर क्लासिकल डान्स करताना दिसते.

अभिनेत्री दीपिका सिंह ‘दिया और बाती’ मालिकेत दिसली होती. उच्चशिक्षित सूनेची भूमिका दीपिकाने साकारली होती.


पहिल्या व्हिडीओत दीपिका ‘मोहब्बतें’ सिनेमातील गाण्यावर क्लासिकल डान्स करताना दिसते. हा व्हिडीओ शेअर करताना दीपिकाने कॅप्शनमध्ये म्हटलंय की, बीचवरील हवेशीर वातावरणात डान्स करणं मला कायमच आवडतं.

याआधी 10 मे रोजीही दीपिकाने एक व्हिडीओ शेअर केला होता, त्यामध्ये सुद्धा क्लासिकल डान्सचा सराव करताना दिसली होती.


2011 साली दीपिका सिंहने स्टार प्लसवरील ‘दिया और बाती’ मालिकेतून करीअर सुरु केलं होतं. सलग पाच वर्षे ही मालिका सुपरहिट राहिली. यामधील दीपिकाची ‘संध्या बिंदणी’ची भूमिका लोकप्रिय ठरली.

त्यानंतर 2014 साली ‘दिया और बाती’चे दिग्दर्शक दीपक गोयल यांच्याशीच दीपिकाने लगीनगाठ बांधली.