Govinda: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता गोविंदा (Govinda) हा त्याच्या कॉमिक टायमिंग आणि नृत्यशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकतो. गोविंदाच्या 80-90 च्या दशकातील विनोदी चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. गोविंदा हा सोशल मीडियावर विविध पोस्ट देखील शेअर करतो. नुकताच गोविंदानं एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करुन गोविंदानं त्याच्या 80-90 च्या दशकातील दोन बायकांबद्दल चाहत्यांना सांगितलं आहे.


गोविंदानं शेअर केलेल्या फोटोनं वेधलं लक्ष 


गोविंदानं चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्यासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, "मला 80 आणि 90 च्या दशकात दोन बायका होत्या. एक सुनीता आणि एक डेव्हिड!" गोविंदानं शेअर केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. 


डेव्हिड धवन यांचा मुलगा अभिनेता वरुण धवन, सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी गोविंदा आणि डेव्हिड धवन यांच्या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत.






गोविंदानं नुकताच रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीत हजेरी लावली. या पार्टीत डेव्हिड धवन यांनी देखील हजेरी लावली. या पार्टीमध्ये गोविंदा आणि डेव्हिड यांची  भेट झाली आणि त्यांनी  एकत्र फोटो देखील काढला.  गोविंदाने याच दिवाळी पार्टीतील पत्नी सुनितासोबतचा एक सुंदर फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला देखील गोविंदानं खास कॅप्शन दिलं.






गोविंदा आणि डेव्हिड धवन यांच्या चित्रपटांना मिळाली प्रेक्षकांची पसंती


गोविंदा आणि डेव्हिड धवन यांनी  अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. यामध्ये कुली नंबर 1, हिरो नंबर 1, शोला और शबनम, राजा बाबू, आँखे आणि पार्टनर सारख्या आयकॉनिक चित्रपटांचा समावेश आहे.   गोविंदा आणि डेव्हिड धवन यांनी  17 चित्रपट एकत्र केले आहेत. 


संबंधित बातम्या:


Happy Birthday Govinda : एकावेळी 40 सिनेमे साईन करणारा 'हिरो नं. 1'; अभिनय आणि नृत्याने चाहत्यांना वेड लावणाऱ्या 'गोविंदा'ची वर्षाची कमाई किती?