Govinda : नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेता गोविंदाचा (Govinda) आज वाढदिवस आहे. त्याचं पूर्ण नाव गोविंदा अरुण आहुजा असं आहे. पण 'गोविंदा' या नावानेच तो ओळखला जातो. अनेक गाजलेल्या सिनेमांत गोविंदाने काम केलं आहे. नृत्याची अदा, विनोदाचं अंग आणि अॅक्शनच्या जोरावर गोविंदाने हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
गोविंदाचा जन्म 21 डिसेंबर 1963 साली एका पंजाबी कुटुंबात झाला. त्याचे वडील अरुण कुमार अभिनेते होते. तर आई निर्मला देवी अभिनेत्री आणि गायिका होती. भावंडांमध्ये गोविंदा सर्वात लहान होता. गोविंदाचं बालपण खूपच आनंददायी केलं. एका सिनेमाच्या निर्मितीत गोविदांच्या वडिलांचे नुकसान झाले त्यामुळे त्यांना मुंबईतील कार्टर रोडवरील
गोविंदा आज एक यशस्वी अभिनेता असला तरी करिअरच्या सुरुवातीला त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. आज गोविंदा 'हिरो नं. 1' म्हणून ओळखला जातो. गोविंदाने 'इल्जाम' (Ilzaam) या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. त्यानंतर अभिनय आणि नृत्याने त्याने जगभरातील चाहत्यांना वेड लावलं.
कधी सिनेमांची लाईन तर कधी काम नाही म्हणून घरात बसलेला गोविंदा....
90 च्या दशकात गोविंदाने एका वेळी 40 सिनेमे साईन केले होते. त्यामुळे जगभरात गोविंदा चर्चेत आला. तसेच 36 तासांमध्ये 14 सिनेमे साईन करण्याचा विक्रमदेखील गोविंदाने केला आहे. पण गेल्या काही दिवसांत एक वाईट काळ गोविंदाने अनुभवला आहे. गोविंदाला पाच वर्षात एकही काम मिळालं नव्हतं.
गोविंदाने 'राजा बाबू' (Raja Babu), 'कुली नंबर 1' (Coolie No. 1), 'साजन चले ससुराल' (Saajan Chale Sasural), 'हिरो नंबर 1', 'दुल्हे राजा', 'स्वर्ग', 'बडे मिया, छोटे मिया', 'जिस देश मे गंगा रहता है', 'नसीब' अशा अनेक सिनेमांत गोविंदाने दमदार भूमिका साकारली आहे. गोविंदाने शक्ती कपूरसोबत 42 सिनेमे तर कादर खानसोबत 41 सिनेमे केले आहेत. गोविंदाला त्याच्या दर्देदार अभिनयासाठी 'मदर तेरेसा' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
गोविंदाची कमाई (Govinda Net Worth) :
गोविंदा एका सिनेमासाठी दोन ते तीन कोटींचं मानधन घेतो. जाहिरातींमधूनदेखील तो चांगलीच कमाई करतो. एका जाहिरातीसाठी तो दोन कोटी मानधन घेतो. गोविंदाची वर्षाची कमाई 10 ते 12 कोटी आहे. गोविंदा 170 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. गोविंदाच्या आलिशान बंगल्याची किंमत 16 कोटी आहे.
संबंधित बातम्या