मुंबई : अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) सुपरहिट चित्रपट 'स्त्री'चा पार्ट-2 चा (Stree 2 Movie) टीझर अखेर रिलीज झाला आहे. काही दिवसांपूर्वी बॉक्स ऑफिसवर धडकलेला 'मुंज्या' चित्रपट एकीकडे कमाई करत आहे. सध्या हॉरर चित्रपटांची क्रेझ वाढलेली पाहायला मिळत असताना आता स्त्री 2 ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन अमर कौशिक (Director Amar Kaushik) यांनी केलं आहे. स्त्री 2 चित्रपट 15 ऑगस्टचा प्रदर्शित होणार आहे.


मध्य प्रदेशातील 'या' हॉन्टेड भागात 'स्त्री 2'चं चित्रीकरण


स्त्री 2 चं पोस्टर समोर आल्यापासूनच हा चित्रपट चर्चेत आहे. स्त्री चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबत चाहत्यांमध्ये क्रेझ वाढत आहे. स्त्री 2 चे चित्रीकरण मध्य प्रदेशातील अनेक भागात झाल्याचं समोर आलं आहे. मध्य प्रदेश हे बॉलिवूड चित्रपटांच्या शूटींगसाठी आवडतं ठिकाण बनलं आहे. फक्त बॉलीवूडच नाही तर अनेक हॉलिवूड चित्रपटांचं चित्रीकरणदेखील मध्य प्रदेशमध्ये झालं आहे. भोपाळमध्ये शूटिंगदरम्यान श्रद्धा कपूर आणि इतर महिलांना केस बांधण्याची सूचना देण्यात आली होती.


शूटिंगदरम्यान महिला कलाकारांना केस बांधण्याची सूचना


अनेक चित्रपट निर्माते आपल्या चित्रपटाचे चित्रीकरण मध्य प्रदेशात करण्याला प्राधान्य देतात. तिथे चित्रीकरण करण्याची त्यांची नेहमीच इच्छा असते. स्त्री 2 चित्रपटाचे चित्रीकरण मध्य प्रदेशातील अनेक भागात झालं आहे. येथील अनेक ठिकाणे हॉन्टेड असल्याचं सांगण्यात येत आहे. याच कारणामुळे अनेक ठिकाणी शूटींगदरम्यान श्रद्धा कपूर आणि सेटवर उपस्थित इतर महिलांना केस बांधून ठेवण्यास सांगण्यात आलं होतं. स्त्री 2 चं शूटिंग मध्य प्रदेशात कुठे झालं आहे, हे जाणून घ्या.


महिलांना परफ्यूम न वापरण्याचीही सूचना


राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांनी स्त्री 2 चित्रपटाचं बहुतेक चित्रीकरण मध्य प्रदेशात केलं आहे. स्त्री 2 च्या शूटिंगसाठी श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव इतर टीमसह भोपाळच्या ताजमहालमध्ये आले होते. येथील शूटिंगदरम्यान महिला कलाकारांना केस बांधून ठेवण्याची आणि परफ्यूम न वापरण्याची सूचना देण्यात आली होती.


स्त्री 2 चं शूटिंग मध्य प्रदेशात कुठे झालं आहे?


भोपाळच्या ताजमहाल हवेलीला हॉन्टेड हवेली म्हणूनही ओळखली जाते. चित्रपटाचे अनेक भागांचं चित्रीकरण येथे करण्यात आलं आहे. 


मध्य प्रदेशातील चंदेरी किल्ल्यामध्येही स्त्री 2 चं शूटिंग झालं आहे. हा किल्ला प्रतिहार राजा कीर्ती पाल याने अकराव्या शतकात बांधला होता. चंदेरी किल्ल्याचा मुख्य दरवाजा 'खूनी दरवाजा' म्हणून ओळखला जातो.


स्त्री 2 चित्रपटाची काही दृश्येही नरसिंगगड किल्ल्यात शूट करण्यात आली आहेत. नरसिंहगड किल्ला भोपाळ आणि कोटा शहरांच्या मध्ये वसलेला आहे. हा बहुमजली किल्ला सुमारे 45 एकर जागेवर पसरलेला आहे.