Google Most Searched Indian Film : 2021 वर्ष संपायला अवघे काही तास उरले आहेत. दरम्यान जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलने या वर्षातील सर्वाधिक सर्च झालेल्या चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' सिनेमाचा किंवा सलमानच्या 'अंतिम'चा समावेश असेल, असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा अंदाज चुकीचा आहे. 


या वर्षी गुगलवर सूर्याचा 'जय भीम' सिनेमा सर्वाधिक सर्च केला गेला. त्यामुळे या वर्षी सर्वाधित सर्च झालेल्या सिनेमांच्या यादीत सुर्याचा 'जय भीम' चित्रपट अव्वल आहे. तमिळ सुपरस्टार सुर्याचा जय भीम सिनेमा या वर्षातला हिट सिनेमा ठरला आहे.  
 हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला असून या सिनेमाला प्रेक्षकांनी सर्वाधिक सर्च केले आहे. तर गुगलवर सर्वाधिक सर्च केलेला दुसरा चित्रपट ठरला आहे बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा 'शेरशाह' सिनेमा. या चित्रपटातील कियारा अडवाणी आणि सिद्धार्थची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. 


या यादीत सलमान खानच्या राधे सिनेमाने तिसरा क्रमांक पटकावला आहे. या यादीत सलमान खानच्या राधेला तिसरा क्रमांक मिळाला आहे. या चित्रपटात सलमानसोबत दिशा पटानी दिसली होती. अभिनेता अक्षय कुमारच्या बेल बॉटम या चित्रपटाला चौथा क्रमांक मिळाला आहे. या चित्रपटात वाणी कपूर खिलाडी अक्षय कुमार सोबत दिसली होती. 


गुगलच्या टॉप सर्च लिस्टमध्ये मार्व्हल इटर्नल्स पाचव्या क्रमांकावर 
मार्व्हल स्टुडिओजचा इटर्नल्स सिनेमा या यादीत समाविष्ट केलेला टॉप रँक असलेला परदेशी सिनेमा आहे. गुगलच्या टॉप सर्च लिस्टमध्ये मार्व्हल इटर्नल्स पाचव्या क्रमांकावर आहे. अक्षय कुमारचा चित्रपट सूर्यवंशी देखील गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. सूर्यवंशी सिनेमाने सातवा क्रमांक पटकावला आहे. 


संबंधित बातम्या


Twitter Trends 2021 : 'हे' हॅशटॅग ठरले सर्वाधिक ट्रेंडिग


Golden Tweets of 2021 : नेटकऱ्यांनी 2021 मध्ये कोणत्या ट्विटला सर्वाधिक रिट्विट आणि लाईक्स केलं...


RRR Trailer Release: RRR चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; ज्यूनियर एनटीआर आणि राम चरणची भन्नाट केमिस्ट्री


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha