भारतीय सिनेप्रेक्षकांत इंग्रजी सिनेमे तथा हॉलिवूडपट बघणाऱ्याचं प्रमाण लक्षणीय आहे. याच सिनेप्रेमींसाठी आता आनंदाची बातमी आहे. सध्याचा जोरात चर्चेत असलेला टेनेट हा चित्रपट भारतीय सेन्सॉर बोर्डाने कोणत्याही अटीशर्ती, कटविना पास केला आहे. या सिनेमाला यूए प्रमाणपत्र मिळालं आहे.


येत्या काळात थिएटरवरची बंदी उठल्यानंतर टेनेट हा कदाचित पहिलाच रिलीज होणारा चित्रपट ठरण्याची शक्यता आहे. याबद्दल टेनेटशी संबंधित मंडळी थिएटर मालकांशी, एक्झिबिटर्सची चर्चा करतायत. तसं झालं तर लॉकडाऊननंतर टेनेट हा भारतात रिलीज होणारा पहिला चित्रपट ठरेल. लॉकडाऊन उठल्यानंतर भारतातल्या 70 टक्के चित्रपटगृहात आधी हा सिनेमा प्रदर्शित करण्यापद्दल चर्चा सुरू आहे. यात महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक या राज्यांचा समावेश होतो.


सलमानची ऑफर शाहरूखने नाकारली, व्यक्तिरेखा सिनेमाच्या केंद्रस्थानी नसल्याने निर्णय


हे असतानाच आता यूए प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या चित्रपटाचं डबिंग करण्यात येणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगु या भाषांमध्ये हा चित्रपट डब होईल. हा चित्रपट सर्वच्या सर्व स्क्रीन्सवर उतरवण्यात येणार आहे. सर्व ताकदीनिशी हा चित्रपट भारतात रिलीज करण्याकडे भर असेल. या चित्रपटाची झालेली हवा लक्षात घेऊन इंग्रजी चित्रपट न लावणाऱ्या थिएटर्सनीही हा चित्रपट लावण्याची तयारी दर्शवली असल्याची माहीती टेनेटच्या निर्मात्यांनी दिली आहे.


सर्वसाधारणपणे हॉलिवूडपट भारतात आला की त्यात बरीच काटछाट केली जाते. काहीवेळा सीन कट केले जातात तर काहीवेळा ऑडिओ म्युट केला जातो. तसं काहीही न झाल्याने टेनेटचे निर्माते खुश आहेत. भारतातल्या जास्तीत जास्त थिएटर्समध्ये हा चित्रपट रिलीज करण्याकडे आता कल असणार आहे. सिनेमाची तारीख अद्याप ठरलेली नाही. लॉकडाऊन उठल्यानंतर ही तारीख जाहीर होईल. हा चित्रपट आल्यावर थिएटरलॉबीला, सिनेविश्वाला एक चांगला जोर येईल असं बोललं जातं.


Pratap Sarnaik | भाजपने महिला आयोगाला हाताशी धरून अटक करायचा खेळ रचलाय : प्रताप सरनाईक