Golden Globe Awards 2023: 'आरआरआर' (RRR) या सुपरहिट चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार (Golden Globe Awards 2023) सोहळ्यामधील दोन कॅटेगिरीमधील नामांकने मिळाली. यामधील बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार 'आरआरआर' मधील नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्यानं पटकावला आहे. सध्या देशभरातील अनेक सेलिब्रिटी  हे सध्या आरआरआर टीमला शुभेच्छा देत आहेत. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी आरआरआर या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 


नरेंद्र मोदी यांचे ट्वीट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, 'अतिशय विशेष कामगिरी! प्रेम रक्षित, काळ भैरव, चंद्रबोस, एम एम कीरावानी,राहुल सिपलीगुंज यांचे कौतुक. तसेच एस. एस. राजामौली, राम चरण, ज्युनियर एनटीआर यांचे देखील अभिनंदन. या प्रतिष्ठित सन्मानाने प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला आहे.' 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, संगीतकार एम एम कीरावानी यांनी स्टेजवर जाऊन हा पुरस्कार स्विकारला. यावेळी आरआरआर चित्रपटाच्या टीमनं टाळ्यांचा कडकडाट केला.






2022 मधील हिट आणि लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांच्या यादीत आरआरआर या पॅन इंडिया फिल्मच्या नावाचा समावेश होतो. एसएस राजामौली यांच्या या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाल्यानं या चित्रपटाचं अनेक जण कौतुक करत आहेत. 






वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Golden Globe Awards 2023: कौतुकास्पद! आरआरआरमधील 'नाटू नाटू' गाण्यानं पटकावला गोल्डन ग्लोब पुरस्कार