मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट असलेल्या 'ठाकरे' सिनेमाच्या निमित्ताने आज मुंबईतील वरळीकारांना हक्काचं सिनेमागृह मिळालं. पुनर्विकासानंतर बंद पडलेलं गीता टॉकीज आज तब्बल आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नव्या रुपात सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध झालं आहे.


दक्षिण मध्य मुंबईतील गिरणगावातले हक्काचं, मनोरंजनाचं स्रोत असलेलं गीता, दीपक, न्यू शिरीन, सत्यम असे अनेक लहान थिएटर, टॉवर्स आणि मल्टिप्लेक्समुळे काळाच्या पडद्याआड गेले. मात्र बाळासाहेब ठाकरेंकडून अस्मितेचे बाळकडू मिळालेल्या शिवसैनिकांनी विकासकाशी संघर्ष करुन आज 'गीता' टॉकीज पुन्हा एकदा उभे केले. यामुळे बाळासाहेबांच्या 'ठाकरे' या सिनेमाच्या शोने शुभारंभ होत असल्याने याला विशेष महत्व प्राप्त झाले.

ठाकरे - झंजावातामागचा माणूस शोधण्याचा प्रयत्न

दरम्यान, मुंबईतील वडाळ्याच्या कार्निव्हल चित्रपटगृहात भल्या पहाटे साडेचार वाजता चित्रपटाच्या फर्स्ट डे फर्स्ट शोला तुडुंब गर्दी झाली होती. पहाटे चार वाजता आधी पूजा करण्यात आली. त्यांनतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुधाने अभिषेक घालण्यात आला. शोचं उद्घाटन या चित्रपटाचे दिगदर्शक अभिजीत पानसे यांनी केलं.

नवाझुद्दीन सिद्दीकी या सिनेमात बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारत असून अभिनेत्री अमृता राव माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

संबंधित बातम्या


'ठाकरे' सिनेमाच्या फर्स्ट डे फर्स्ट शोला तुडुंब गर्दी


महाराष्ट्राचा वाघ आला! सर्वत्र 'ठाकरे'चाच फिवर


'ठाकरे'चं पोस्टर न लावल्याने शिवसैनिकांचा थिएटरबाहेर गोंधळ


'ठाकरे'च्या निर्माते आणि दिग्दर्शकांमधील वाद शिगेला


'ठाकरे' स्क्रीनिंगला मानापमान नाट्य, संजय राऊत यांची सारवासारव


मनसेने 'ठाकरे' चित्रपटाला शुभेच्छा दिल्या, पण....


बाळासाहेब ठाकरे 'अॅक्सिडेंटल शिवसेनाप्रमुख' नव्हते : संजय राऊत

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि संजय राऊत 'माझा' कट्ट्यावर

ठाकरे सिनेमातील 'आया रे सबका बापरे...' गाणं प्रदर्शित

सत्तर रुपयांचा 'शिववडा' खात थिएटरमध्ये 'ठाकरे' पाहा!


'ठाकरे' साठी दोन हिंदी चित्रपटांच्या तारखा पुढे ढकलल्या!


'ठाकरे' सिनेमातील संवादावर अभिनेता सिद्धार्थचा आक्षेप


'ठाकरे' व्यतिरिक्त कोणताही सिनेमा रिलीज होऊ देणार नाही : बाळा लोकरे