मुंबई : सुपरस्टार रजनीकांत आणि राधिका आपटे यांच्या बहुप्रतिक्षीत कबाली या सिनेमाचं दुसरं पोस्टर रिलीज झालं आहे. रजनीकांत आणि राधिका आपटे या पोस्टरवर झळकले आहेत.


 

येत्या 22 जुलैला हा सिनेमा जगभरात प्रदर्शित होणार आहे.

 

कबाली सिनेमा भारतासह जगभरातील 5 हजार स्क्रीन्सवर दाखवला जाणार आहे. विशेष म्हणजे कबाली सिनेमाच्या रुपाने पहिल्यांदाच एखादा भारतीय सिनेमा जगभरातील 5 हजार स्क्रीन्सवर दाखवला जाणार आहे.

 

मलेशिया, चीन आणि थायलंड देशांच्या भाषेतही सिनेमा डब करण्यात आला असून, 22 जुलै रोजी सिनेमा रिलीज होणार आहे. अमेरिकेमध्ये 'कबाली' 500 स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

व्हॉट्सअॅपवरील रजनीकांत यांच्या 'कबाली'च्या 'इमोजीचं व्हायरल सत्य

इरफान म्हणतो, रजनीकांतने पोस्टरची कल्पना चोरली, पण..