Gayatri Joshi Accident : 'स्वदेश' (Swades) फेम गायत्री जोशी (Gayatri Joshi) तुम्हाला आठवते का? आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने 2004 हे वर्ष चांगलच गाजवलं. त्यानंतर उद्योगपती विकास ओबेरॉयसोबत तिने संसार थाटला आणि इंडस्ट्रीला रामराम ठोकला. पण आता गायत्री जोशी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. इटलीत (Italy) पतीसोबत फिरायला गेली असताना तिचा अपघात झाला आहे. तिच्या लॅम्बोर्गिनीने फरारीला धडक दिली असून या अपघातात (Gayatri Joshi Accident)  एका स्विस कपलचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर गायत्री जोशी सध्या काय करते? कुठे असते? हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.


कोण आहे गायत्री जोशी? (Who is Gayatri Joshi)


बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'स्वदेश' (Swades) या सिनेमाच्या माध्यमातून गायत्री जोशीने (Gayatri Joshi) मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. 2004 मध्ये तिचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. गायत्रीचा पहिलावहिला सिनेमा सुपरहिट ठरला. पण त्यानंतर लगेचच तिने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. 


गायत्री जोशी 1999 मध्ये 'मिस इंडिया'च्या टॉप पाच स्पर्धकांमध्ये होती. त्यानंतर 2000 मध्ये ती जपानमध्ये होणाऱ्या मिस इंटरनॅशनल कार्यक्रमात भारताचं प्रतिनिधित्व करताना दिसून आली. मॉडेल म्हणून लोकप्रियता मिळवल्यानंतर तिला अभिनयाची आवड निर्माण झाली. गायत्रीने 2001 मध्ये आशुतोष गोवारीकरच्या 'स्वदेश' या सिनेमातील अभिनयाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पहिल्याच सिनेमात ती थेट किंग खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली. या सिनेमात तिने शिक्षिकेची भूमिका साकारली होती. 


गायत्री जोशीने देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींमध्ये गणना होणाऱ्या विकास ओबेरॉयसोबत (Vikas Oberoi) लग्न केलं. लग्नानंतर पतीसोबत काम करता यावं यासाठी तिने इंडस्ट्री सोडली असल्याची चर्चा आहे. विकास आणि गायत्री 2005 मध्ये लास वेगासमध्ये लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर तिने मनोरंजनसृष्टीला अलविदा केलं. गायत्री आणि विकासला दोन मुली आहे. 


'स्वदेश' फेम अभिनेत्रीचा पती कोट्यवधींचा मालक (Who is Vikas Oberoi)


गायत्री जोशीचा पती विकास ओबेरॉय हा कोट्यवधींचा मालक आहे. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये त्याचा समावेश होतो. जगभरात विकास 'रिअल इस्टेट टॉयकून' या नावाने ओळखला जातो. मुंबईत तो रियल इस्टेट फर्म चालवतो. 'ओबेरॉय रिअॅलिटी'चा तो मॅनेजिंग डिरेक्टर आहे. त्याअंतर्गत तो 40 पेक्षा अधिक कंस्ट्रक्शनवर तो काम करत आहे. 


मीडिया रिपोर्टनुसार, 53 वर्षीय विकासची संपत्ती 25 कोटींपेक्षा अधिक आहे. मुंबईसह गोवा आणि पुण्यात काही प्रोजेक्टवर तो काम करत आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये तो 65 व्या क्रमांकावर आहे. हार्वर्ड विद्यापीठातून त्याने शिक्षण घेतलं आहे.


गायत्री जोशीचा अपघात कसा झाला? (Gayatri Joshi Accident)


गायत्री जोशी आपल्या पतीसोबत इटलीला गेली होती. त्यावेळी त्यांच्या लॅम्बोर्गिनीने फरारीला धडक दिली. गायत्री आणि विकास या अपघातातून थोडक्यात बचावले असून एका स्विस कपलचा मात्र मृत्यू झाला. 




संबंधित बातम्या


Gayatri Joshi : 'स्वदेश' अभिनेत्रीचा इटलीत कार अपघात; स्विस कपलने गमावला जीव