Rajan Patil On Gautami Patil : नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या तिच्या कार्यक्रमात होणाऱ्या गोंधळ आणि हुल्लडबाजीमुळे चर्चेत आहे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला की त्या कार्यक्रमात राडा, गोंधळ होतच असतो. नुकतचं नागपुरात नृत्यांगनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी कार्यक्रम पाहायला आलेल्या मंडळींनी खुर्च्यांची तोडफोड करत गोंधळ घातला. आता याप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते राजन पाटील (Rajan Patil) यांनी जाहीर प्रश्न उपस्थित केले आहेत.


गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ झाल्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज होतो. आता अभिनेते राजन पाटील यांनी गौतमीचे कार्यक्रम, उत्पन्न आणि व्हायरल होणाऱ्या बातम्यांवर फेसबुक पोस्ट शेअर करत जाहीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते आहे. 


राजन पाटील यांची पोस्ट काय? (Ranjan Patil Post On Gautami Patil)


राजन पाटील यांनी लिहिलं आहे,नमस्कार मंडळी, या काही प्रश्नांची उत्तरे शोधा....
1. गौतमी पाटीलच्या प्रत्येक कार्यक्रमात राडा होऊन पोलिसांचा लाठीमार का होतो? यापूर्वी रसिकांना अनेक लावणी सम्राज्ञींनी वेड लावले होते. पण असा प्रकार क्वचितच झाला असेल. मग आत्ताच का? 
2. गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमाचे मूल्य काही लाखात असते?
3.जर हे सत्य असेल तर ती या सर्व उत्तपन्नावर आयकर भरते का? 
4. गौतमीच्या उत्पन्नात कोणी सक्षम/ सशक्त असामी वाटेकरी आहे का? 
5. जर असेल तर तो अदृश्य असामी कुठल्या विशिष्ट पक्षाचा आहे का? की 'तेलगी' प्रकरणात होते म्हणे तसे सर्वपक्षीय सामील आहेत? 
6. काही दबंग वाहिन्या ती अत्यंत भोळी आहे, निरागस आहे, निष्पाप असून तिची हकनाक बदनामी केली जात आहे, अशी इमेज तयार करत आहेत का? 
7.  गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा यात काहीतरी गूढ आहे असं तुम्हाला वाटतं का? 



राजन यांनी सात प्रश्न विचारले असून त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात त्यांनी नेटकऱ्यांना सांगितलं आहे. राजन यांच्या पोस्टवर राडा घालणारेच तिला मोठं करत आहेत, चिंतनीय बाब आहे. हल्ली सरळमार्गी माणसाला कायदा पाळावा लागतो, राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य होत नाही, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 


गौतमी पाटीलच्या प्रत्येक कार्यक्रमाला गोंधळ होत असला तरी चाहते मात्र तुफान गर्दी करतात. लहान मुलं, महिलावर्गापासून ते वयोवृ्ध्दांपर्यंत सर्वच मंडळी तिच्या कार्यक्रमाला हजेरी लावत असतात. आता ज्येष्ठ अभिनेते राजन पाटील यांच्या पोस्टनंतर वेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे. 


संबंधित बातम्या


Nagpur : नागपुरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात अनेक डझन खुर्च्या तुटल्या, हुल्लडबाजांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार