Taali: बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने (Sushmita Sen)  काही दिवसांपूर्वी तिच्या 'ताली' (Taali) या आगामी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले.  या पोस्टरला सुष्मितानं कॅप्शन दिलं, 'ताली- बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी! ' साडी, लाल टिंकली, हातात खड्याळ अन् गळ्यात माळ अशा लूकमधील फोटो सुष्मितानं शेअर केले.  या चित्रपटात सुष्मिता एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सुष्मिता टाळी वाजवताना दिसत दिसत आहे. सुष्मिता ट्रान्सजेंडर गौरी सावंत (Gauri Sawant)  यांची भूमिका साकारत आहे. नुकतीच गौरी सावंत यांनी सुष्मितासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. 


गौरी सावंत यांची पोस्ट
गौरी सावंत यांनी सुष्मितासोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोला गौरी यांनी खास कॅप्शन दिलं आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, 'आम्ही मूळ बायकाच.. त्यात माझी भूमिका तू करणार म्हणजे दुग्धशर्करा योग.. हा माझ्या समाजाचा खूप मोठा सन्मान, तुझ्या धाडसाला त्रिवार सलाम..' अनेक नेटकऱ्यांनी गौरी यांच्या पोस्टला कमेंट करुन त्यांना आणि सुष्मिताला त्यांच्या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 



आणखी एक पोस्ट गौरी यांनी शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, 'कोण म्हणतं परिवार नाही.. दिवसेंदिवस तुमच्या सारख्या गोड माणसांची भर पडतच चाललीये.. समानतेच्या वाटेवर तुम्ही दिलेल्या प्रेमाची मी आयुष्य भर ऋणी राहीन.. आज हे लिहिताना डोळ्यांच्या कडा ओलावल्या, पण जेव्हा मी जगाचा निरोप घेईन तेव्हा तुमच्या डोळ्याचे अश्रू कोणी पुसू शकणार नाही.. देवाचे आभार.. नांदुया सौख्य भरे....'






गौरी सावंत कोण आहेत?


गौरी सावंत या अॅक्टिविस्ट आहेत. त्यांच्या आयुष्यावर आधारित जिवनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या जिवनपटामध्ये सुष्मिता सेन ही गौरी सावंत यांची भूमिका साकारणार आहे. गौरी सावंत यांचा जन्म पुण्यात झाला. त्या समाजसेविका आहेत. गौरी या महिला आणि अनाथ मुलांसाठी काम करतात. कौन बनेगा करोडपतीच्या 9 व्या सिझनमध्ये देखील गौरी यांनी हजेरी लावली होती. 


सुष्मिता सेनच्या करिअरमध्ये 'आर्या' वेबसीरिजचा महत्त्वाचा वाटा आहे. या सीरिजचा तिसरा सीझन देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुष्मिताच्या आगामी चित्रपटांची आणि वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Sushmita Sen: सुष्मिता सेन साकारणार गौरी सावंत यांची भूमिका; शेअर केला 'ताली' मधील लूक