Gashmeer Mahajani: अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. झुंज, मुंबईचा फौजदार, लक्ष्मीची पाऊले यांसारख्या चित्रपटात रवींद्र महाजनी यांनी काम केलं. रवींद्र महाजनी यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. रवींद्र महाजनी यांचा मुलगा गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) यानं नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून गश्मीरनं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.


गश्मीर महाजनीची पोस्ट


गश्मीर महाजनीनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं. 'स्टार हा कायमच स्टार असतो. मी आणि माझ्या जवळच्या व्यक्तींनी आणि कुटुंबाने शांत राहण्याचं ठरवलं आहे. जे लोक आमचा द्वेष करत आहेत, आमच्याबद्दल वाईट बोलत आहेत  त्यांचे आम्ही स्वागतच करत आहोत. आपल्यामधून निघून गेलेल्या आत्म्याला देव शांती देवो. ओम शांती. ते माझे वडील आणि माझ्या आईचे पती होते. आम्ही त्यांना तुमच्यापैकी चांगले ओळखतो. कदाचित भविष्यात जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी याबाबत बोलेन.' गश्मीरच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.



रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचा मृतदेह पुण्यातील तळेगाव-दाभाडे येथील त्यांच्या (Death) घरात आढळून आला.  रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूनंतर मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली. एकनाथ शिंदे,  देवेंद्र फडणवीस, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देखील रवींद्र महाजनी यांना श्रद्धांजली वाहिली. रवींद्र महाजनी यांनी 'जाणता अ जाणता' या मराठी नाटकाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर 'तो राजहंस एक' हे त्यांची प्रमुख भूमिका असलेलं नाटक रंगभूमीवर आलं. 'झुंड' या  1974 मध्ये आलेल्या या सिनेमाने रवींद्र महाजनी यांना सुपरस्टार केलं. 


गश्मीर (Gashmeer Mahajani)  हा विविध मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. गश्मीरचा काही दिवसांपूर्वी विशू हा चित्रपट रिलीज झाला.तेरे इश्क में घायल, इमली या हिंदी मालिकांमध्ये देखील गश्मीरनं काम केलं. 






वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Ravindra Mahajani : मराठी सिनेसृष्टीतील स्टार किड गश्मीर महाजनीला पितृशोक! राहत्या घरात आढळला अभिनेत्याचा मृतदेह; जाणून घ्या अभिनेते रविंद्र महाजनींबद्दल...