Gashmeer Mahajani:  अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) हा  चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असतो. नुकतेच गश्मीरनं अस्क गश हे सेशन केलं. या सेशनमध्ये अनेक नेटकऱ्यांनी गश्मीरला विविध विषयांवर आधारित असणारे प्रश्न विचारले. या प्रश्नांना गश्मीरनं उत्तरं दिली आहे.


"सर तुमच्या आई वडिलांचं अरेंज मॅरेज झालं की लव्ह मॅरेज कारण मला जाणून घ्यायला आवडेल की मधू मॅडम सारख्या एवढ्या छान व्यक्ती रवींद्र सरांच्या आयुष्यात कशा आल्या?" असा प्रश्न एका नेटकऱ्यानं गश्मीरला विचारला. गश्मीरनं या प्रश्नाचं उत्तर दिलं, “त्यांचे लव्ह मॅरेज होते. पण दुर्दैवाने मनापासून प्रेम फक्त तिनेच केलं.”




पुढे एका चाहत्यानं गश्मीरच्या प्रश्न उत्तरांच्या सेशनमध्ये कमेंट केली, 'तुमचे वडील रवींद्र सर यांचे चित्रपट आमच्या घरी आजही आवडीने पाहिले जातात. ग्रेट पर्सनॅलिटी' गश्मीरनं याला रिप्लाय दिला, Indeed




'तुमचे वडील तळेगावात राहत असल्याचे मला कळले असते तर मी त्यांना नक्कीच भेटलो असतो' अशी कमेंट देखील एका नेटकऱ्यानं केली. या कमेंटला गश्मीरनं हार्ट इमेजी शेअर करुन रिप्लाय दिला.




रवींद्र महाजनी यांचे चित्रपट


गश्मीरचे वडील  रवींद्र महाजनी  (Ravindra Mahajani)  यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. रवींद्र महाजनी यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.  त्यांच्या 'आराम हराम आहे', 'लक्ष्मी', 'लक्ष्मीची पावलं',' देवता', 'गोंधळात गोंधळ', 'मुंबईचा फौजदार' या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.






गश्मीरचे चित्रपट


देऊळ बंद, कान्हा, विशू, वन वे तिकीट, बोनस आणि  कॅरी ऑन मराठा या मराठी चित्रपटांमध्ये गश्मीरनं काम केलं. तसेच त्यानं तेरे इश्क में घायल, इमली या हिंदी मालिकांमध्ये देखील गश्मीरनं काम केलं. गश्मीरच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. गश्मीर हा सोशल मीडियावर चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत असतो. तसेच आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देखील गश्मीर सोशल मीडियाच्या माध्यमातून देतो. गश्मीरला इन्स्टाग्रामवर  382k फॉलोवर्स आहेत.


संबंधित बातम्या


Gashmeer Mahajani : "आमचं नातं एकतर्फी होतं..गेल्या तीन वर्षांपासून..."; वडिलांच्या निधनानंतर अखेर गश्मीर महाजनीचा खुलासा