Ganpath Teaser Out : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि कृती सेनन (Kriti Sanon) च्या आगामी 'गणपत' सिनेमाचा 
टीझर रिलीज झाला आहे. गणपत सिनेमाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. गणपत'च्या टीझरमध्ये टायगर श्रॉफ अॅक्शन करताना दिसत आहे. टायगर श्रॉफच्या सिक्स पॅक बॉडीने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. गणपतचा टीझर (Ganpath Teaser) प्रदर्शित होताच सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.  


टायगर श्रॉफ आणि कृती सेननसह सिनेमाच्या निर्मात्यांनीदेखील 'गणपत'चा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. टायगर श्रॉफने टीझर शेअर करत कॅप्शन लिहिले आहे, देवाच्या आशीर्वादाने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पुढील ख्रिसमसमध्ये गणपत सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 23 डिसेंबर 2022 रोजी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.





 अॅक्शनच्या तडका असलेल्या 'गणपत' सिनेमात टायगर श्रॉफ आणि कृती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. विकास बहल, वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख आणि जॅकी भगनानी निर्मित या चित्रपटात धमाकेदार अॅक्शन पाहायला मिळणार आहे. गणपत हा बिग बजेट सिनेमा आहे. सिनेमात टायगर श्रॉफच नाही तर कृती सेननदेखील अॅक्शन करताना दिसणार आहे. शूटिंगदरम्यान टायगर श्रॉफच्या डोळ्याला दुखापत झाली होती. 


सिनेमात टायगर श्रॉफ आणि कृती सेननसोबत दिसणार 'हे' कलाकार
सिनेमात टायगर श्रॉफ आणि कृती सेननसोबत कोणते कलाकार असतील त्याबाबत अनेक अंदाज लावले जात होते. नोरा फतेही आणि नुपुर  सेनॉनचे नावही चर्चेत होती. पण नंतर त्या भूमिकेसाठी अली अवरामची निवड करण्यात आली. अली अवराम गणपतमध्ये महत्तवाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच अमिताभ बच्चनदेखील सिनेमात महत्तवाची भूमिका साकारणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


संबंधित बातम्या


Ganapath Movie : 'गणपत' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान टायगर श्रॉफच्या डोळ्याला दुखापत, फोटो शेअर करत दिली माहिती


Gadar 2 : Sunny Deol च्या 'गदर 2' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात, तारा सिंहच्या फर्स्ट लूकची चाहत्यांमध्ये चर्चा


Radhe Shyam Trailer : Prabhas च्या आगामी 'राधे श्याम'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, हिंदी भाषेतदेखील होणार प्रदर्शित


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha