Bal Shivaji Marathi Movie : भारतातील तीन प्रसिद्ध स्टुडिओ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी आणि वीर बालपणीच्या अकथित कथांवर आधारित अशी प्रतिष्ठित ऐतिहासिक गाथा तयार करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'बाल शिवाजी' हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या बारा वर्षापासून ते सोळा वर्षापर्यंतचा जीवनप्रवास सोनेरी पडद्यावर रेखाटणार आहेत. हा प्रवास म्हणजे आपल्या स्वराज्याचा पाया रचण्यास त्यांना झालेली मदत आहे. 


दिग्गज चित्रपट निर्माते, दिग्दर्शक रवी जाधव दिग्दर्शित हा 'बाल शिवाजी' चित्रपट असणार असून, जून 2022 मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होईल. 'इरॉस इंटरनॅशनल', 'आनंद पंडित मोशन पिक्चर्स', 'रवी जाधव फिल्म्स' आणि 'लिजेंड स्टुडिओज' प्रस्तुत आणि इरॉस इंटरनॅशनल', 'आनंद पंडित', 'रवी जाधव' आणि संदीप सिंग निर्मित सॅम खान, रूपा पंडित सहनिर्मित मराठा आयकॉन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392व्या जयंतीनिमित्त ड्रीम प्रोजेक्ट 'बाल शिवाजी'ची घोषणा केली. या चित्रपटाकरिता जय पंड्या असोसिएट प्रोड्युसरची भूमिका बजावत आहेत. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 ते 16 वर्षांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करेल, ज्याने त्यांना "स्वराज्य"चा पाया रचण्यात मदत केली.



'बाल शिवाजी' चित्रपट तरुण छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेखनीय प्रवास डोळ्यासमोर उभा करेल, कारण आपल्या शौर्याने देशाला प्रेरणा देणारा हा सर्व काळातील महान राजांपैकी एक आहे. सेल्युलॉइडवर कथन करण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी आठ वर्षांचे संशोधन लागले, असे दिग्दर्शक रवी जाधव म्हणाले. यापुढे बोलताना ते असे म्हणाले की, त्यांना 2015पासून या विषयावर चित्रपट बनवायचा होता. जाधव यांनी गेल्या वर्षी निर्माता संदीप सिंग यांची भेट घेऊन त्यांना ही कथा सांगितली. ही शौर्यगाथा सांगण्याचे महत्त्व समजून घेतलेल्या संदीपला ही सकारात्मक ऊर्जा मिळाली. भारतावर राज्य केलेल्या महान राजांपैकी एकाचा हा चित्रपट आहे, हा चित्रपट जगभरातील सर्व तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. 


भारताच्या इतिहासाचे भविष्य घडवणाऱ्या शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या घटनांच्या अनेक कथांवर या दृश्यात्मक चित्रणातून प्रकाश टाकला जाईल. “मला ऐतिहासिक चित्रपट निर्मितीची आवड आहे. म्हणून रवीने मांडलेला हा विषय माझ्यासाठी कामी आला.  छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वावर आधारित चित्रपट बनवणे हा सन्मान आहे,” असे लिजेंड स्टुडिओचे चित्रपट निर्माते संदीप सिंग म्हणाले.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha