Gangubai Kathaiwadi Box Office Collection : आलिया भटचा  (Alia Bhatt)  बहुचर्चित चित्रपट गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) शुक्रवारी (25 फेब्रुवारी) प्रदर्शित झाला. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहात होते. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली. आता हा चित्रपट प्रदर्शित होऊन सात दिवस झाले. तरी देखील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पाहूयात या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 


सहा दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 
रिपोर्टनुसार, गंगूबाई काठियावाडी या चित्रपटानं 63 कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्याचं दिवशी बॉक्स ऑफिसवर दहा कोटी कमाई केली होती. त्यानंतर शनिवारी (26 फेब्रुवारी) या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 13.32 कोटी होते. तसेच रविवारी 15 कोटी, सोमवारी 8.19 कोटी आणि मंगळवारी 10.01 कोटीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन या चित्रपटानं केलं. बुधवारी या चित्रपटानं 6.25 कोटींची कमाई केली. 






आता देशातील काही राज्यांमध्ये चित्रपटगृह ही 100 टक्के क्षमतेनं सुरू होणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर त्याचा परिणाम होऊ शकतो. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. चित्रपटात आलिया भट शांतनु, आलिया, अजय देवगणस विजय राज, सीमा पाहवा यांनी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली.  


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha