सलमान खानला जीवानिशी मारेन, बिष्णोईची धमकी
एबीपी माझा वेब टीम | 07 Jan 2018 11:16 AM (IST)
बिष्णोईवर हत्येचा प्रयत्न, खंडणी आणि अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी 20 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
मुंबई : बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पंजाबमधील कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईने ही धमकी दिली. राजस्थानमधील जोधपूरमध्येच सलमान खानला संपवणार असल्याची धमकी बिष्णोईने दिली. बिष्णोईवर हत्येचा प्रयत्न, खंडणी आणि अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी 20 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. एका उद्योगपतीची हत्या केल्याच्या प्रकरणातील सुनावणीसाठी जोधपूर कोर्टात बिष्णोईला आणण्यात आले होते. त्यावेळी बिष्णोईने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली. धमकीमागचं नेमकं कारण कळू शकलेलं नसलं, तरी काळवीट शिकार प्रकरणाशी याचा संबंध जोडला जातो आहे. दरम्यान, बिष्णोईच्या धमकीची गंभीर दखल घेत, सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करणार असल्याची माहिती पोलासांनी दिली.