Ganesh Utsav 2022 : सध्या दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेझ देशातच नाही तर जगभरात वाढत आहे. अशातच गणेशोत्सवातही ही क्रेझ पहायला मिळत आहे. पुष्पा (Pushpa) या चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) लूकमधील गणेशाच्या मूर्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता आरआरआर (RRR) या चित्रपटातील अभिनेता रामचरणच्या (Ram Charan) लूकमधील बाप्पाच्या मूर्तीचा फोटो व्हायरल झाला आहे.
एस. एस. रजामौली (S.S. Rajamouli) यांनी दिग्दर्शित केलेल्या आरआरआर (RRR) या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली. या चित्रपटामध्ये अभिनेता रामचरण, ज्युनियर एनटीआर, अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता आलिया भट्टनं प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयानं देखील प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं. या चित्रपटातील राम चरणच्या लूकमधील बाप्पाच्या मूर्तीचा फोटो व्हायरल झाला आहे.
पाहा व्हायरल फोटो:
तेलुगु पीरियड ड्रामा 'RRR' ने या वर्षाच्या सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले. हा सिनेमा 25 मार्च रोजी सिनेमागृहात रिलीज झाला. 'आरआरआर' हा बिग बजेट सिनेमा आहे. या सिनेमाने जगभरात तब्बल 1000 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 1000 कोटींचा व्यवसाय करूनही 'आरआरआर'ची क्रेझ अद्याप थांबली नाही. हा चित्रपट नंतर नेटफ्लिक्स या ओटीटीवर देखील रिलीज झाला. ओटीटीवर देखील या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. शोबू यारलागड्डा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: