Ganesh Utsav 2022 : गणपती बाप्पाच्या आगमनाची सध्या घरोघरी जय्यत तयारी सुरू आहे. मखर, सजावट, फुलांचा हार, प्रसाद अशा अनेक गोष्टींची सध्या घरोघरी तयारी सुरू आहे. दोन वर्षांनंतर बाप्पाचं थाटामाटात स्वागत करण्यात येत आहे. त्यामुळे सजावटीचे वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा: द राइज' (Pushpa: The Rise) या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला. आजही सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये दिसत आहे. कारण गणेशोत्सवात 'पुष्पा' स्टाइल बाप्पाची मुर्ती बनवण्यात आली आहे. 


'पुष्पा' स्टाइल बाप्पाच्या मुर्तीचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे यंदा काही ठिकाणी पुष्पा स्टाइलमध्ये बाप्पाचं आगमन होणार आहे. अल्लू अर्जुनचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यामुळे त्याचे चाहते त्याच्या स्टाइलमध्ये बाप्पाचं आगमन करत आहेत. त्यामुळे यंदा गणेशोत्सवात दाक्षिणात्य सिनेमांची क्रेझ पाहायला मिळत आहे. 


अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा : द राईज’ या सिनेमाने अनेक रेकॉर्ड केले होते. हा सिनेमाने 100 कोटींच्या क्लबमध्ये आपलं स्थान निर्माण केलं होतं. अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा : द राईज’ हा ब्लॉकबस्टर सिनेमा 17 डिसेंबर 2021 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अल्लू अर्जुन व्यतिरिक्त दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्नादेखील मुख्य भूमिकेत होती. सुकुमारने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. आता 'पुष्पा 2'च्या शूटिंगला सुरुवात झाली असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 




अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'पुष्पा द रुल' या सिनेमाच्या शूटिंगला अखेर सुरुवात झाली आहे. 'पुष्पा: द रूल' या सिनेमात 'पुष्पा: द राइज' प्रमाणेच प्रेक्षकांना नाट्य, अॅक्शन आणि थ्रिल बघायला मिळणार आहे. 'पुष्पा: द रूल' हा सिनेमा आता किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 


संबंधित बातम्या


Pushpa 2 : अल्लू अर्जुन अन् रश्मिका मंदान्नाची जोडी पुन्हा धुमाकूळ घालणार; 'पुष्पा 2'च्या शूटिंगला सुरुवात