Sunny Deol Gadar 2 Sceened In New Parliament Building : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांचा 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली आहे. 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या सिनेमाने आतापर्यंत 494.6 कोटींची कमाई केली असून लवकरच हा सिनेमा 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल. पण आता 'गदर 2' या सिनेमाचं संसदेत विशेष स्क्रीनिंग (Gadar 2 Sceened In New Parliament Building) आयोजित करणार असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे तारा सिंहचा आवाज आता संसदेतही घुमणार आहे. 


सिनेविश्लेषक कोमल नाहटा (Komal Nahta) यांनी ट्वीट केलं आहे,"आजपासून (25 ऑगस्ट) तीन दिवस संसदेच्या नव्या इमारतीत संसदेतील सदस्यांसाठी 'गदर 2' या सिनेमाचं विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं आहे. किती सन्मानाची बाब आहे". कोमल नाहटा यांचं ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 






'गदर 2' हा सिनेमा प्रदर्शित होऊन दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. रिलीजच्या दोन आठवड्यात या सिनेमाने 400 कोटींचा गल्ला जमवला आहे. नव्या संसद भवनात 'गदर 2' या सिनेमाचा शो आयोजित करण्यात आला आहे. आजपासून तीन दिवस हे स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं आहे. झी स्टुडिओजने याबद्दल दुजोरा दिला असला तरी यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


बॉलिवूड अभिनेता सनी देओल हा राजकारणातदेखील अॅक्टिव्ह आहे. अभिनेत्याने 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. भाजप खासदार सनी देओल 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलं जात आहे. 


सनी देओलच्या 'गदर 2'ची बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई


सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा 'गदर : एक प्रेम कथा' (Gadar : Ek Prem Katha) हा सिनेमा 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाचा दुसरा भाग आता 22 वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'गदर 2'ने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे. 'गदर 2' या सिनेमाने भारतात 419.1 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 500 कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनानंतर सर्वाधिक कमाई करणारा 'गदर 2' हा दुसरा सिनेमा ठरला आहे.


संबंधित बातम्या


Sunny Deol : सनी देओल आणि त्याच्या सिनेमांना पाकिस्तानात बंदी; अभिनेत्याच्या मुंबईतील बंगल्याचाही होणार लिलाव; नेमकं प्रकरण काय?