Pathaan Box Office Collection Day 10 : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) सिनेमाचा सध्या बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. दिवसेंदिवस हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. या सिनेमाने आता सिनेमागृहात 10 दिवस पूर्ण केले आहेत. किंग खानने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. चाहते पुन्हा पुन्हा सिनेमागृहात जाऊन लाडक्या सेलिब्रिटीचा सिनेमा पाहत आहेत. 


'पठाण'चं 10 दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या (Pathaan 10 Days Box Office Collection) 



  • पहिला दिवस : 57 कोटी

  • दुसरा दिवस : 70.5 कोटी

  • तिसरा दिवस : 39.25 कोटी

  • चौथा दिवस : 53.25 कोटी

  • पाचवा दिवस : 60.75 कोटी

  • सहावा दिवस : 26.5 कोटी

  • सातवा दिवस : 23 कोटी

  • आठवा दिवस : 18.25 कोटी

  • नऊवा दिवस : 15.65 कोटी

  • दहावा दिवस : 15 कोटी

  • एकूण कमाई : 379.18 कोटी


रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील!


शाहरुखच्या 'पठाण'ची (Pathaan) चाहत्यांमध्ये रिलीजआधीपासूनच क्रेझ होती. रिलीजआधीच या सिनेमाने 24 कोटींची कमाई केली होती. पहिल्या दिवशी या सिनेमाने 57 कोटींची कमाई करत सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. पहिल्या वीकेंडला या सिनेमाने 300 कोटींचा गल्ला जमवला होता. आता रिलीजच्या दुसऱ्या वीकेंडला हा सिनेमा 400 कोटींच्या क्लमध्ये सामील होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. 






'पठाण'ची वाटचाल 700 कोटींच्या दिशेने


'पठाण' या ब्लॉकबस्टर सिनेमाने जगभरात 6.96 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे लवकरच हा सिनेमा 700 कोटींचा टप्पा पार करेल. जगभरातील अनेक बिग बजेट सिनेमांना या सिनेमाने मागे टाकलं आहे. परदेशात 'पठाण'चे खास शो आयोजित करण्यात आले आहेत. 


तगडी स्टारकास्ट असलेला 'पठाण'


'पठाण' या सिनेमात शाहरुख खान (Shah Rukh Khan), दीपिका पादुकोण (Deepika Padukone), जॉन अब्राहम (John Abrham), आशुतोष राणा (Ashutosh Rana) आणि डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची (Salman Khan) झलकदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. पठाण आणि टायगरची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. या मल्टिस्टार सिनेमात शाहरुख एका रॉ एजंटच्या भूमिकेत दिसत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Pathaan Box Office Collection Day 8: पठाणची जादू बॉक्स ऑफिसवर कायम; आठव्या दिवशीही कमावला कोट्यवधींचा गल्ला