चंदिगढ : लुधियाना जिल्हा सत्र न्यायालयाने बॉलिवूड अभिनेत्री आणि आयटम गर्ल राखी सावंत विरोधात नवीन अटक वॉरंट जारी केलं आहे. तिला वाल्मिकी ऋषींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणातील खटल्याच्या सुनावणीवेळी कोर्टात हजर राहण्याचे आदेश होते. पण ती अनुपस्थित राहिल्याने, तिच्याविरोधात न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं.
राखी सावंत सध्या वाल्मिकी ऋषींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी जामीनावर बाहेर आहे. गेल्याच महिन्यात कनिष्ठ न्यायालयाने फेटाळत तिच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं. यानंतर तिने जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेत जामीनासाठी याचिका दाखल केली.
विशेष म्हणजे, सुनावणीच्या आदल्या दिवशी आत्मसमर्पण केलं. यामुळे तिला न्यायालयाने जामीन मंजूर केला. पण दुसऱ्याच दिवशी तिचा जामीन अर्ज न्यायालयाने रद्द करत, 7 ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश दिले.
पण या सुनावणीवेळीही ती अनुपस्थित राहिली. तसेच राखी सध्या अमेरिकेत असल्याने सुनावणीसाठी अनुपस्थित राहिल्याची माहिती राखीच्या वकीलाने कोर्टाला दिली. त्यामुळे न्यायालयाने तिच्या कृतीवर नाराजी व्यक्त करत, तिच्या विरोधात पुन्हा अटक वॉरंट जारी केलं.
दरम्यान, मार्च महिन्यात तिच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. यानंतर तिला अटक करण्यासाठी पंजाब पोलिसांचं एक पथक मुंबईत आलं होतं. पण तिच्या पत्त्यावर ती नसल्याने पोलिसांना माघारी जावं लागलं होतं.
वाल्मिकी ऋषींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, राखी सावंत पुन्हा अडचणीत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Aug 2017 07:12 PM (IST)
लुधियाना जिल्हा सत्र न्यायालयानं बॉलिवूड अभिनेत्री आणि आयटम गर्ल राखी सावंत विरोधात नवीत अटक वॉरंट जारी केलं आहे. तिला वाल्मिकी ऋषींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणातील खटल्याच्या सुनावणीवेळी कोर्टात हजर राहण्याचे आदेश होते. पण ती अनुपस्थित राहिल्याने, तिच्याविरोधात कोर्टानं अटक वॉरंट जारी केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -