दहशतवाद आणि रॉ.. 'फोर्स 2' चा ट्रेलर लाँच
एबीपी माझा वेब टीम | 30 Sep 2016 03:05 PM (IST)
मुंबईः अभिनेता जॉन अब्राहमच्या 'फोर्स 2' या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. 2011 मधील सुरहिट सिनेमा 'फोर्स'चा हा सिक्वेल आहे. दोन रॉ एजेंटची कहाणी या सिनेमात दाखवली आहे. जॉन एका जबरदस्त भूमिकेत दिसणार आहे. सोनाक्षी सिन्हा, जॉन अब्राहम आणि ताहीर राज भासिन या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. जॉनने या सिनेमाची निर्मिती केली आहे, तर अभिनय देव यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. ताहीर या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत असून रॉ एजेंटची भूमिका साकारली आहे. येत्या 18 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. पाहा ट्रेलरः