TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -


'शेर शिवराज'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज


प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या 'पावनखिंड'  आणि फत्तेशिकस्त या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता लवकरच त्यांचा 'शेर शिवराज' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा नुकताच धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. शिवकालीन इतिहासातील सुवर्णपान ठरावा असा अफजलखान वधाचा अध्याय 22 एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 


 'फुले' चित्रपटाचं पोस्टर रिलीज


स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे महात्मा जोतीराव फुले  यांची आज जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त आज (11 एप्रिल)  'फुले' या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचं कथानक महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये असे दिसत आहे की चित्रपटामध्ये अभिनेता प्रतिक गांधी हा महात्मा जोतीराव फुले यांची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री पत्रलेखा ही सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणार आहे. 


'रनवे 34'चा ट्रेलर आऊट


अजय देवगणच्या बहुप्रतिक्षित 'रनवे 34'चा दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये अजय देवगण कॅप्टन विक्रांत खन्नाच्या भूमिकेत दिसत आहे. हा सिनेमा 29 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरमध्ये अजय देवगण पायलटच्या भूमिकेत असून प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत विमानातील लोकांचे प्राण वाचवताना दिसत आहे. 


‘एक होतं माळीन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला


जुन्नर तालुक्यातील माळीण गावात 2014 मध्ये दरड कोसळल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेवर आधारित ‘एक होतं माळीण’ या चित्रपटातून ती घटना 29 जुलै रोजी मोठ्या पडद्यावर येत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दमदार संहिता हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.


'बच्चन पांडे' ओटीटीवर होणार रिलीज


सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर खिलाडी अक्षय कुमारचा  'बच्चन पांडे' आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा 15 एप्रिलला अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.  सिनेमात अक्षय कुमार, कृती सेनन आणि जॅकलीन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहेत. फरहाद सामजी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. तर साजिद नाडियादवाला यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.


संबंधित बातम्या


Jersey : 'जर्सी' सिनेमाची रिलीज डेट ढकलली पुढे, 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित


Beast : थलापती विजयच्या 'बीस्ट' चित्रपटाच्या निर्मात्यांना फटका; कुवेतनंतर आता 'या' देशांमध्ये देखील बॅन