मुंबई : संजय लीला भन्सालीच्या 'पद्मावती' सिनेमातील दीपिका पादूकोणचा लूक अनेकांना आवडला. आता शाहिद कपूर त्याच्या लूकमुळे इंटरनेवर चर्चेत आहे. दीपिकाच्या लूकनंतर आता सिनेमात महारावल रतन सिंहची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या शाहिद कपूरचा लढवय्या लूक समोर आला आहे.
शाहिद कपूरने ट्विटरवर आपला शानदार लूक शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताच नेटीझन्सच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. शाहिदचा अंदाज अनेकांना आवडत आहे.
आरशाद्वारे मुखदर्शन देणारी राणी पद्मावती कोण होती?
https://twitter.com/shahidkapoor/status/912117699353903104
https://twitter.com/shahidkapoor/status/912123675746463744
शाहिदचा लूक अद्भुत असल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे. हा लूक 'पद्मावती'च्या शानदार पोस्टरपैकी एक असल्याचं काही जण म्हणाले तर काहींनी शाहिदच्या इन्टेन्स लूकचं कौतुक केलं. काही व्यक्तिरेखा मनात घर करतात, ही (महारावल रतन सिंह) त्यापैकी एक असेल, अशी प्रतिक्रिया काहींनी दिली.
‘पद्मावती’त रणवीर सिंगच्या प्रियकराच्या भूमिकेत जिम सर्भ?
'पद्मावती' चित्रपटात रणवीर सिंह अल्लाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत आहे. तर शाहिद कपूर राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीच्या भूमिकेत आहे. अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे. रणवीर सिंह पहिल्यांदाच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. गोलियोंकी रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे.
विशेष म्हणजे 'पद्मा'वती चित्रपट पुढील वर्षी एप्रिल महिन्यात रिलीज होणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु चाहत्यांना आनंदाचा धक्का देत यावर्षीच हा सिनेमा प्रदर्शित करण्याचं भन्सालींनी जाहीर केलं आहे. एक डिसेंबर 2017 रोजी 'पद्मावती' सिनेमागृहांमध्ये झळकेल.
संबंधित बातम्या
'पद्मावती'तील दीपिकाचा फर्स्ट लूक, रीलिज डेटही निश्चित!
‘पद्मावती’त रणवीर सिंगच्या प्रियकराच्या भूमिकेत जिम सर्भ?
बहुप्रतीक्षित 'पद्मावती'चा लोगो रिलीज, फर्स्ट लूकची उत्सुकता शिगेला!
आरशाद्वारे मुखदर्शन देणारी राणी पद्मावती कोण होती?
'पद्मावती'मधील शाहिदच्या लूकची इंटरनेटवर जोरदार चर्चा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Sep 2017 12:24 PM (IST)
शाहिद कपूरने ट्विटरवर आपला शानदार लूक शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताच नेटीझन्सच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. शाहिदचा अंदाज अनेकांना आवडत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -