Mahabharat : बॉलिवूडमधील वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. 3D चित्रपट देखील प्रेक्षक आवडीनं बघतात. आता लवकरच 5 D चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं नाव  महाभारत असणार आहे, अशी चर्चा सध्या सुरु आहे. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, फिरोज नाडियाडवाला (Firoz Nadiadwala) हे 'महाभारत' (Mahabharat) या 5D चित्रपटावर काम करत आहेत.  फिरोज यांनी हेरा फेरी आणि वेलकम या दोन चित्रपटांची निर्मिती केली आहे. 


2025 मध्ये रिलीज होणार 5D चित्रपट
'महाभारत' या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर चार ते पाच वर्ष काम केलं गेलं आहे. या चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनमध्ये मेकर्सला काही वर्ष लागतील. डिसेंबर 2025 मध्ये हा चित्रपट रिलीज केला जाईल, असं म्हटलं जात आहे. आता या 5 D चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.   


700 कोटी बजेट 
रिपोर्टनुसार, हा चित्रपट तीन तासांचा असणार आहे. 'महाभारत' या चित्रपटाचं बजेट 700 कोटी असणार आहे, असंही म्हटलं जात आहे. या चित्रपटाबाबत अजून निर्मात्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. 


तगडी स्टार कास्ट
अक्षय कुमार, अजय देवगन, रणवीर सिंह, परेश रावल, नाना पाटेकर, अनिल कपूर यांसारखे बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार महाभारतमध्ये महत्त्वाची भूमिका साकारतील, अशी चर्चा आहे. तसेच इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री देखील या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारतील. 


1965 मध्ये झाली होती महाभारत चित्रपटाची निर्मिती 
फिरोज नाडियाडवाला यांच्या वडिलांनी म्हणजेच एजी नाडियाडवाला यांनी  महाभारत चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट 1965 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. में प्रदीप कुमार, पद्मिनी आणि दारा सिंह यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. आता नव्या माहाभारत या चित्रपटाला 5 D स्वरुपात पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.  


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :