मुंबई: प्रभादेवीतील वीर सावरकर मार्गावरील बो मोंड इमारतीला भीषण आग लागली. या इमारतीच्या 33 व्या मजल्याला ही आग लागली.
आगीची तीव्रता पाहून अग्नीशमन दलाच्या 10 गाड्या आणि 3 वॉटर टँकर घटनास्थळी रवाना झाले. सध्या आग विझवण्याचं काम सुरु आहे.
ही आग कशामुळे लागली याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही. अग्निशमनदलाला या आगीची माहिती दुपारी 2 वाजून 16 मिनिटांनी मिळाली.
दीपिकाचं घर
याच इमारतीच्या 26 व्या मजल्यावर अभिनेत्री दीपिका पदुकोणचं भव्य घर आहे. दीपिकाचा 2776 स्क्वेअर फूट एरिया असलेला 4 बीएचके फ्लॅट या इमारतीत आहे.
हे घर दीपिकाने 2010 मध्ये तब्बल 16 कोटी रुपयांना घेतलं होतं.
सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टॉप 10 सेलिब्रिटींमध्ये दीपिकाचा समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे दीपिकाने याच इमारतीत कार्यलयही घेतलं आहे.
33 मजली असलेल्या या इमारतीच्या 26 व्या मजल्यावर दीपिकाने 2010 साली घेतलेल्या घराची किंमत 16 कोटी होती. ती किंमत आता आणखी वाढली आहे.
दीपिकाच्या घराची वैशिष्ट्ये
4 बीएचके फ्लॅट
एरिया - 2776 स्क्वेअर फूट
2010 सालची किंमत – 16 कोटी
भीषण आग
प्रभादेवीतील वीर सावरकर मार्गावरील बो मोंड इमारतीला भीषण आग लागली आहे. या इमारतीच्या 33 व्या मजल्याला ही आग लागली आहे. आगीची तीव्रता पाहून अग्नीशमन दलाच्या 10 गाड्या आणि 3 वॉटर टँकर घटनास्थळी रवाना झाले आहेत. सध्या आग विझवण्याचं काम सुरु आहे.
ही आग कशामुळे लागली याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही. अग्निशमनदलाला या आगीची माहिती दुपारी 2 वाजून 16 मिनिटांनी मिळाली.
फायर ब्रिगेडच्या शिड्या तोकड्या
बो मोंड इमारतीच्या 33 व्या मजल्याला आग लागली असली, तरी फायर ब्रिगेडकडे तेवढ्या उंचीची शिडीच उपलब्ध नाही. त्यामुळे ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागत आहे.
दरम्यान, या इमारतीतून जवळपास 100 जणांची सुखरुप सुटका केली आहे. 6 फायर इंजिन, 5 जंबो टँकर आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल आहेत.
संबंधित बातम्या
दीपिका पदुकोण राहात असलेल्या इमारतीला भीषण आग
2776 स्क्वे फूट एरिया, 4 बीएचके, कसा आहे दीपिकाचा भव्य फ्लॅट?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Jun 2018 04:00 PM (IST)
प्रभादेवीतील वीर सावरकर मार्गावरील बो मोंड इमारतीला भीषण आग लागली. याच इमारतीच्या 26 व्या मजल्यावर अभिनेत्री दीपिका पदुकोणचं भव्य घर आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -