पुणे: बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा याच्यावर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कात सिद्धार्थ चोप्राचं हॉटेल आहे आणि तिथं अनधिकृतपणे स्मोकिंग झोनच्या बाहेर हुक्काही उपलब्ध करुन दिल्याचं पोलिसांच्या धाडीत समोर आलं आहे.

 

पोलिसांनी 18 हुक्का मशीन जप्त केल्या आहेत. तसंच 16 ग्राहकांना नोटिसाही बजावल्या आहेत. आतापर्यंत सिद्धार्थ चोप्राच्या या हॉटेलवर कारवाई करण्याची ही दुसरी वेळ आहे.

 

दरम्यान, पुण्याच्या गुन्हे शाखेनं ही करावाई केली असून या सगळ्या प्रकारावर सिद्धार्थ चोप्राची कुठलीही प्रतिक्रिया अद्याप समजलेली नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.