Fighter First Look : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) सध्या त्याच्या आगामी 'फायटर' (Fighter) या सिनेमामुळे चर्चेत आहे. आता या सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. या फोटोमध्ये हृतिक रोशन स्कवाड्रन लीडरच्या भूमिकेत दिसत आहे.
'फायटर'च्या नव्या पोस्टरमध्ये हृतिक रोशन स्कवाड्रन लीडरच्या भूमिकेत असून तो फायटर विमानाला हात लावताना दिसत आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट करण्यासोबत निर्मात्यांनी या सिनेमाची रिलीज डेटदेखील जाहीर केली आहे.
हृतिक रोशनने 'फायटर' सिनेमाचं नवं पोस्टर शेअर करत हा सिनेमा 25 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं जाहीर केलं आहे. या सिनेमाचं फर्स्ट लूक आऊट झाल्याने प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. प्रेक्षक कमेंट्स करत त्याला अनेक प्रश्न विचारत आहेत. फायटर तेलुगूमध्येही प्रदर्शित होणार का? सिनेमाची आणखी प्रतीक्षा करू शकत नाही, फायटर हा सिनेमा नक्कीच मला आवडेल, अशा कमेंट्स चाहते करत आहेत.
'फायटर' या सिनेमात हृतिक रोशनसोबत दीपिका पादुकोणदेखील (Deepika Padukone) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या 'पठाण' या सिनेमाचे दिग्दर्शन केलेले सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. 2.5 कोटींमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.
'फायटर'च्या स्टारकास्टबद्दल जाणून घ्या... (Fighter Movie Starcast)
हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणसह 'फायटर' या सिनेमात अनिल कपूर, आणि करण सिंह ग्रोवर हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. तसेच सिद्धार्थ आनंद, रमोन चिब, ज्योती देशपांडे, अजीत अंधरे आणि अंकु पांडे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.
'फायटर' या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. या सिनेमात हृतिक एअरफोर्स ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार असून त्याच्या अॅक्शनचा तडका पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 25 जानेवारी 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हृतिकचा 'वॉर 2' (War 2) हा सिनेमादेखील प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमात तो ज्युनिअर एनटीआरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
संबंधित बातम्या