Fighter First Look OUT: अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan), आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone) 'फायटर' (Fighter) हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. आता या चित्रपटामधील हृतिकचा लूक रिलीज करण्यात आला आहे.
हृतिकच्या लूकनं वेधलं लक्ष (Hrithik Roshan Look In Fighter)
'फायटर' या चित्रपटातील हृतिक रोशनचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. त्याच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. हृतिक रोशननं सोशल मीडियावर त्याच्या फायटर या चित्रपटामधील लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करुन त्यानं चित्रपटामधील त्याच्या भूमिकेची माहिती दिली आहे.
'फायटर'मध्ये हृतिक साकारणार 'ही' भूमिका
'फायटर' या चित्रपटामध्ये हृतिक हा स्क्वाड्रन लीडर समशेर पठानिया ही भूमिका साकारणार आहे. हृतिकनं त्याच्या फायटर या चित्रपटामधील लूकचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "स्क्वाड्रन लीडर समशेर पठानिया, कॉल साइन-पॅटी, डेजिग्नेशन: स्क्वाड्रन, पायलट, यूनिट: एयर ड्रॅगन्स, फाइटर फॉरएवर"
कधी रिलीज होणार फायटर? (Fighter Release Date)
फायटर या चित्रपटाच्या माध्यमातून हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण हे पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत. त्यांची जोडी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात अनिल कपूर यांनी देखील महत्वाची भूमिका साकारली आहे. सिद्धार्थचा हृतिकसोबतचा हा तिसरा चित्रपट असणार आहे. याआधी दोघांनी 'वॉर', 'बँग बँग' या चित्रपटांसाठी एकत्र काम केले आहे. फाइटर' हा चित्रपट पुढच्या वर्षी 25 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
काही दिवसांपूर्वी फायटर या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. या मोशन पोस्टरमध्ये अनिल कपूर, हृतिक आणि दीपिका यांचा डॅशिंग लूक बघायला मिळाला. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
संबंधित बातम्या: