मुंबई : दिग्दर्शक अभिनेता फरहान अख्तर आणि अँकर-अभिनेत्री शिबानी दांडेकर यांचं अफेअर असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. परदेशात दोघं हातात हात घालून फिरत असल्याचे फोटो दोघांच्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळत आहेत.

फरहान आणि शिबानी कॅनडातील व्हॅनकुअरमध्ये फिरत आहेत. फरहान इंटरनॅशनल म्युझिक टूरवर असून शिबानी त्याच्यासोबत कॅनडात गेल्याचं पाहायला मिळत आहे.

एका रिअॅलिटी शोच्या सेटवर फरहान आणि शिबानी यांची भेट झाली होती. ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं. त्यानंतर दोघांनी डेटिंग सुरु केल्याचं म्हटलं जातं.

काही दिवसांपूर्वी शिबानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊण्टवर एक फोटो शेअर केला होता. यामध्ये एका पाठमोऱ्या तरुणाचा हात शिबानीने धरल्याचं दिसत होतं. अनेक जणांनी हा फरहान असल्याचा अंदाज वर्तवला.


फरहान अख्तरनेही आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शिबानी दांडेकरचे फोटो पोस्ट केले होते. त्यामुळे दोघं आपलं रिलेशनशीप जगजाहीर करत आहेत का, अशी उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.



फरहान अख्तर 16 वर्षांच्या संसारानंतर पत्नी अधुनासोबत विभक्त झाला होता. 2016 मध्ये घटस्फोट झाल्यानंतर फरहानचं नाव अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत जोडलं जात होतं.