नवी दिल्ली : राजकीय मंचावर नेहमी सक्रीय राहणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करचे सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीत वेगळंच रुप पाहायला मिळत आहे. स्वरा भास्कर देशभर विविध राजकीय पक्षांचा प्रचार करण्यात व्यस्त आहे. स्वरा भास्कर गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत आम आदमी पार्टी (आप), बिहारमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा (सीपीआएम)आणि मध्य प्रदेशात काँग्रेसचा प्रचार करत आहे.
स्वराने तिच्या प्रचाराची सुरुवात बिहारमधून केली. बिहारच्या बेगुसराय मतदार संघातील सीपीआयचे उमेदवार कन्हैय्या कुमार यांच्या प्रचार रॅलीत स्वरा सहभागी झाली होती. बेगुसरायमध्ये तिने कन्हैय्या यांनी आयोजित केलेल्या रोड शो आणि सभांना हजेरी लावली.
बिहारनंतर स्वराने तिचा मोर्चा मध्य प्रदेशकडे वळवला. मध्य प्रदेशमधील भोपाळ लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या प्रचारसभेला स्वरा भास्करने हजेरी झाली. भोपाळध्ये तिने काँग्रेससाठी प्रचार केला.
वाचा : मोदी सरकारला विरोध, अनुपम खेर आणि स्वरा भास्कर आमने-सामने
मध्य प्रदेशनंतर स्वराने दिल्ली गाठली. दिल्लीत तिने पूर्व दिल्ली मतदार संघातील आपच्या उमेदवार आतिशी मार्लेना यांचा प्रचार केला. स्वरा आता दक्षिण दिल्ली मतदार संघातील आपचे उमेदवार राघव चड्ढा यांचादेखील प्रचार करणार आहे.
वाचा : #MeToo : स्वरा भास्करचा दिग्दर्शकावर लैंगिक शोषणाचा आरोप
स्वरा भास्करकडून दिल्लीत आपचा, बिहारमध्ये कम्युनिस्ट पार्टीचा आणि मध्य प्रदेशात काँग्रेसचा प्रचार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 May 2019 12:10 PM (IST)
राजकीय मंचावर नेहमी सक्रीय राहणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करचे सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीत वेगळंच रुप पाहायला मिळत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -